अकोला (प्रतिनिधी)-
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व कृषी विद्यापीठ कामगार युनियन आयटकने आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलावर शारीरीक दुरू पाळुन लॉकडावुन अनलॉकडावुनचे सर्व निकस पाळुन ६ दिवस १२ महिणे काम देण्यात यावे. ६००
रोजंदारी मजुर यांना ११ महिण्याचे मजुर पदावर नियुक्त करण्यात यावे, शेतकरी विरोधी कायद्ये रद्द करा. २०२० चे कामगारांचे नुकसान करणारे कायद्ये रद्द करा, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करु नका, शैक्षणीक धोरण २०२० रद्द करा. या प्रमुख मागणीसह १६ मागण्या करिता कॉ. रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली निदर्शने करित कॉ. नयन गायकवाड म्हणाले की, मा. नरेंद्र मोदि केंद्र सरकार शेतकरी व कामगार विरोधी सरकार असे २०१४ पासुन भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक जनतेला आवाहन करित होते परंतु जनेतेला भुल थापा देत मा. नरेंद्र मोदि/केंद्र सरकारने सत्तेत आल्यावर त्यांचा छुपा मनसुबा पुर्ण करत अवघ्या ३-४ मिनीटात शेतकरी व कामगार विरोधी कायद्ये पास करुन घेत भारतीय जनतेला देशो धडीला लावले आहे. या करिता भारतीय जनता मा. नरेंद्र मोदि/केंद्र सरकारला माफ करणार नाही महाराष्ट्र सारखी देशाची सत्ता सुध्दा लोकशाहीच्या
माध्यमातुन मिळवुन घेवु देश पातळीचे निवेदन कोरोणा विषाणुच्या प्रादृभाव असल्याने ई-मेलने मा. जिल्हाधिकारी अकोला यांचे द्वारे निवेदन मा. राष्ट्रपती भारत सरकार यांना व महाराष्ट्रात हे कायद्ये पास करुन नये म्हणुन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार यांना पाठविण्यात आले. त्यानंतर गगणभेदी नारे लावत स्थानिक प्रश्ना बाबत मा. कुलगुरू व मा. कुलसचिव यांना निवेदन देत
कॉ. नयन गायकवाड म्हणाले की, मा. कुलसचिव यांचे ६ दिवस काम उपलब्ध करुन द्यावे असे अनेक पत्र काढल्यावर सुध्दा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठतील अधिकारी वर्ग सदर पत्रांना केराची टोपली दाखवत शेतमजुर व रोजंदारी मजुर यांना भरपुर काम असतांना सुध्दा कामावरुन बंद करित आहे आणि युनियनने दिलेल्या निवेदनावर प्रशासन कार्यवाही करित नाही आपण बेजबाबदार अधिकारी वर्गावर कार्यवाही करावी. सन २००६ ते २०१४, पर्यंत जेष्ठते प्रमाणे विद्यापीठातील शेतमजुर व रोजंदारी मजुर यांना ११ महिण्याची तात्पुरत्या मजुर या पदावर युनियनने केलेल्या निवेदन व आंदोलना नंतर नियुक्त केले होते तसेच रोजंदारी मजुर पदावर शेतमजुर व रोजंदारी मजुर यांना ११ महिण्याची तात्पुरत्या मजुर पदावर नेमण्यात यावे अन्यथा उग्र आंदोलन झाल्यास युनियन जवाबदार राहणार नाही. या निदर्शने आंदोलनात. कॉ. मदन जगताप, कॉ. नयन गायकवाड,
कॉ. सुहास अग्नहोत्री, कॉ. कुरुमदास गायकवाड, गौवर्धन शेगावकर, शंकर नेवारे, गोतम अहीर, उमेश नाइतनवरे, हे उपस्थीत होते असे कॉ. रमेश गुहे व संतोष मोरे यांनी आपल्या प्रसिध्द पत्रकाद्वारे कळविले आहे.