अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 426 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 336 अहवाल निगेटीव्ह तर 90 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोन मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6924 (5701+1068+155) झाली आहे. आज दिवसभरात 199 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 36910 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 35966, फेरतपासणीचे 201 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 743 नमुने होते. आजपर्यंत एकूण 36280 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 30579 तर पॉझिटीव्ह अहवाल 6924(5701+1068+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 90 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 90 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुष आहे. त्यात सिव्हील लाईन, खदान व मोरगाव भाकरे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 87 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 33 महिला व 54 पुरुष आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील 11 जण, कुटासा व जीएमसी येथील प्रत्येकी नऊ जण, लर्डी हॉर्डींग जवळ येथील चार जण, कौलखेड, खदान, जठारपेठ, अकोट व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन जण, अकोट फैल, मंडूरा, शात्री नगर, वानखडे नगर, गौरक्षण रोड, मोठी उमरी, रेणूका नगर, सिंधी कॅम्प व सिरसो येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, महसूल कॉलनी, बायपास, लक्ष्मी नगर, चांदूर, डाबकी रोड, देवरावबाबा चाळ, बाळापूर, कान्हेरी गवळी, बोरगाव मंजू, कच्ची खोली, शिवनी, खिरपूर, हिंगणा रोड, अंबिकी नगर, खडकी, बळीराम चौक, किनखेड, मोरगाव भाकरे, खोलेश्वर व दहिंहाडा येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
दोन मयत
दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात मोरगाव उरळ येथील 50 वर्षीय महिला असून ती 20 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर अकोट येथील 79 वर्षीय पुरुष असून ते 20 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
199 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 40 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून नऊ जण डिस्चार्ज देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथील आठ जण, हॉटेल रिजेन्सी येथील चार जण, ओझोन हॉस्पीटल येथील सात जण, युनिक हॉस्पीटल येथील दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन जण, आर्युवेदीक महाविद्यालय येथून दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आले. तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा 125 जणांना अशा एकूण 199 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
1563 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 6924(5701+1068+155) आहे. त्यातील 217 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 5144 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1563 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.