तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा शहरातील गौतमा नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील वस्तीत नदीचे पाणी शिरल्याने काही कुटुंबवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते अश्या अत्यंत हालाकीच्या परिस्थिती जीवन जगणाऱ्या कुटूंबियांना शिवसेनेच्या वतीने राशन धान्य देऊन मदत करण्यात आली होती त्याच बरोबर त्यांना तात्काळ शासनाने आर्थिक मदत करावी या करिता तहसीलदार यांना भेटून मागणी करण्यात आली होती व शासकीय अनुदान मिळवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरवा करण्यात आला होता.याबाबत आज 24 सप्टेंबर ला तहसील कार्यालय तेल्हारा येथे शिवसेनेचे पदाधिकारी व तहसीलदार राजेन्द्र सुरवडकर यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांना शासकीय अनुदान वाटप करण्यात आले .
हल्ली कोरोनाचे भले मोठे संकट ओढवलेलं आहे अशातच शहरातील गौतमा नदीला दि 30/02/2020 ला मध्यरात्री अचानक पूर आल्याने नदी काठच्या गरीब कुटूंबाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले व.या कुटूंबियांचे घरातील राशन धान्य , कपडे, भांडे ,दैनंदिन साहित्य, कोंबड्या ,बकऱ्या , नदीच्या पुरात वाहून गेल्याने हे कुटुंबे उघड्यावर आले होते .त्यामुळे या कुटूंबाचे हाल सुरू असल्याने .या कुटुंबांना मदतीचा हाथ म्हणून शिवसेना युवासेनेच्या वतीने राशन धान्य देऊन मदतीचा हाथ पुढे करण्यात आला होता.त्याच बरोबर तेल्हारा तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन सादर करून या कुटूंबाना त्वरित मदत करण्याची मागणी शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आली होती याबाबत पाठपुरावा करून शिवसेनाच्या मदतीचे पूरग्रस्तांना आर्थिक लाभ मिळाला आहे.या पूरग्रस्त कुटूंबियांना शासकीय अनुदान धनादेश आज वाटप करण्यात आले आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड, जिल्हा परिषद सदस्य संजय आढाउ,माजी तालुका प्रमुख शंकरराव ताथोड, माजी शहर प्रमुख पप्पू सोनटक्के,माजी तालुका प्रमुख युवासेना निलेश धनभर, माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर , युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे, रहेमान शाह ,गजानन मोरखडे, भास्कर कोरडे , शिवा सोनटक्के , संजय लांडे , यांच्या सह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते