अकोट(देवानंद खिरकर)-गेल्या दोन दिवसापासून फेसबुक वर कपल चॅलेंज या विषयाचा धुमाकूळ चालू आहे फेसबुक वर आपल्या जोडीदाराचे फोटो टाका यामध्ये शर्यतच चालू आहे जणू
तुमची बायको दाखवा,
तुमची सुंदर मुलगी दाखवा,
अश्या रिकाम्या परंतु भविष्यात घातक ठरू शकणाऱ्या चॅलेंजस चा महापूर सध्या FB वर पहायला मिळतो आहे.
FB वरून मुलींचे व स्त्रियांचे फोटो घेऊन घाणेरड्या पेजेस वर टाकण्याचे नीच प्रकार सातत्याने होत असताना, असले प्रकार होत आहे. आणि यात सुशिक्षित म्हणवणारे (प्रामुख्याने हिंदू) लोकच दिसून येतात..
आपल्या घरातील स्त्रिया प्रदर्शनाची वस्तू आहेत का?
उद्या आपल्या घरातील स्त्रीच्या फोटो सह “कसा माल आहे?” अशी कमेंट दिसली तर दोष कुणाला द्यायचा..?
याचा ही विचार करायला हवा…
असे रिकामे आणि फालतू ची आव्हाने घेऊन काय दाखविले जाते..?
सध्या भारत देशामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मी सुद्धा स्त्रियांचा आदर करतो पण अशा पद्धतीने आपल्याच घरातील आई बहिणीचे फेसबुक वर प्रदर्शन करणे मुळीच योग्य वाटत नाही
आपल्याला जर स्पर्धाच करायचे आहे तर व्हाट्सअप वर आपल्या आप्तेष्ट (नातेवाईक ) मंडळींचा एक ग्रुप तयार करावा आणि मग त्या ग्रुपमध्ये तुमचेच नातेवाईक असल्यामुळे कोणाचेही फोटो टाकण्यास काही हरकत नाही पण फेसबुक वर टाकत असणारे फोटो हे सर्वीकडे व्हायरल होत आहेत आणि एखाद्या नालायक माणसांनी तुमच्या घरातील आई, बहिणीच्या फोटोचा गैरवापर करून तो फोटो फेसबुक वर टाकला तर भविष्यात हे फार घातक होणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की जर स्पर्धाच करायचे आहे तर या कोरोना काळामध्ये सहकार्याची स्पर्धा का करू नये
आव्हान स्वीकारायचे तर,
स्वच्छतेचे, कोरोना विरुद्ध लढण्याचे,
या अवघड काळात अन्न, वस्त्र वाटपाचे किमान चार विद्यार्थ्यांना वही पुस्तक देण्याचे घाययला हवे.
कृपया जरा तरी विचार करा असे आवाहन ह.भ.प.श्री. गणेश महाराज शेटे युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केले.