अकोट(देवानंद खिरकर)- अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अड्गाव खुर्द व हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोरवा या दोन ठिकाणावरुन स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल एक क्विंटल 46 किलो गांजा जप्त करण्याची कारवाई केली आहे.या कारवाईत तब्बल 23 लाख 36 हजारांचा गांजा पोलीसांनि जप्त केला असुन,दोन आरोपींना अटक केली आहे.एक आरोपी घटनास्थळावरुन फरार होण्यात यशस्वी झाला.स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरुन त्यांनी त्यांचे एक पथक अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतिल अड्गाव खुर्द येथिल रहिवाशी राजु सोळंके यांच्या घरातून कैलास पवार व राजु सोळंके या दोघांच्या मालकीचा 40 किलो गांजा जप्त केला.त्या नंतर दोघांनाही ताब्यात घेवून त्यांनी दिलेल्या माहीती वरुन हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोरवा येथिल रहिवाशी शत्रुघ्न चव्हाण यांच्या घरातून 1 क्विंटल 6 किलो गांजा जप्त केला आहे.या दोन कारवाया मध्ये 1 क्विंटल 46 किलो गांजा किंमत 23 लाख 36 हजार रुपये असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनी दिली.राजू सोळंके राहणार अड्गाव व कैलाश पवार राहणार वारीहनुमान या दोघांना अटक करन्यात आली असुन शत्रुघ्न चव्हान राहणार बोरवा हा घटनास्थळावरुन फरार झाला.ही कारवाई पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ,पी एस आय छाया वाघ, सागर हटवार,वाघ,सदाशिव सुरवाडकर,पांडे,राजपाल ठाकुर,गोपाल माजीद,रवि ईरचे,रफिक,अक्षय,अनिल राठोड यांनी केली आहे.