तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील आजी माजी सैनिकांची बैठक दि. 21/09/2002 रोजी संपन्न झाली या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून आजी माजी सैनिक संघटना ची कार्यकारिणी गठीत करण्यात आली .
देशाच्या संरक्षणासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिक सेवेनंतरही सामाजिक बांधिलकी जोपासत असतो. हीच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आजी माजी सैनिक संघटना सदैव सेवेत राहणार आहे .या करिता तेल्हारा तालुका व शहरातील आजी माजी सैनिकांनी एकत्र येऊन आजी माजी सैनिक संघटना स्थापन केली आहे .
या संघटनेच्या अध्यक्षपदी राम जानकीराम पाऊलझगडे , उपाध्यक्ष पदी रामेश्वर सुरेश घंगाळ , कोषाध्यक्ष पदी सुमेध सुरेश गायगोळ, सचिव पदी दिनेश माकोडे , संयोजक पदी सुरेश महादेवराव जवकार यांची सर्वनुमाते नियुक्ती करण्यात आली आहे. व या संघटनेच्या माध्यमातून माजी आजी सैनिकांच्या विविध समस्या ,अडचणी सोडवण्या साठी ही संघटना कार्य करणार आहे , तसेच येणाऱ्या काळात विविध सामाजिक उपक्रम संघटने कडून राबविण्यात येणार आहेत.यावेळी सर्व आजी माजी सैनिक उपस्थित होते.