अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 259 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 190 अहवाल निगेटीव्ह तर 69 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोन मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6827(5611+1061+155) झाली आहे. आज दिवसभरात 155 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 36484 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 35547, फेरतपासणीचे 201 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 736 नमुने होते. आजपर्यंत एकूण 35854 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 30243 तर पॉझिटीव्ह अहवाल 6827(5611+1061+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 69 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 69 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 56 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 22 महिला व 34 पुरुष आहे. त्यात तारफैल, सिंधी कॅम्प व हरिहर पेठ येथील पाच जण, कौलखेड, खडकी, मोठी उमरी येथील तीन जण,सारकिन्ही, रामदासपेठ, जीएमसी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बीॲन्डसी क्वॉटर, केशव नगर,कलाल चाळ, माधव नगर, जूने कापड मॉर्केट, न्यु भीम नगर, रेणूका नगर, रणपिसे नगर, बहिरगेट, बार्शीटाकळी, खिस्तीयन कॉलनी, गौरक्षण रोड, डाबकी रोड, अकोट, लहान उमरी, मलकापूर, वडाळी देशमुख, देशमुख फैल, जय हिंद चौक, वानखडे नगर, खोलेश्वर, शिवाजी नगर, गीता नगर, दाळंबी, मुर्तिजापूर व पागोरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व नऊ पुरुष आहे. त्यातील जीएमसी येथील दोन जण, तर उर्वरित राजाराम नगर, रणपिसे नगर, आकृती नगर, बार्शीटाकळी, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, काटेपूर्णा, राम नगर, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प व खदान येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 22 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
दोन मयत
दरम्यान आज दोघाचा मृत्यू झाला. त्यात हिरपूर ता. मुर्तिजापूर येथील 45 वर्षीय पुरुष असून ते 21 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. तसेच खाजगी रुग्णालयात आळशी प्लॉट येथील 58 वर्षीय पुरुष असून त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
155 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 30 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 15 जण डिस्चार्ज देण्यात आला. तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा 110 जणांना अशा एकूण 155 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशा एकूण 155 जणांना डिस्चार्ज देण्यात आले.
1667 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 6827(5611+1061+155) आहे. त्यातील 215 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 4945 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1667 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.