अकोला – अकोल्यातील व्यापा-यांनी वाढत्या रुग्ण संख्येच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर कोरोना साखळी खंडित करण्याचे नावाने २५ ते २९ तारखे पर्यंत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.हा प्रकार म्हणजे गोरगरीब जनतेला वेठीस धरून काळा बाजाराला प्रोत्साहन देणारा आहे.केंद्र सरकारने लॉक डाऊन आणि जनता कर्फ्यू ह्या प्रकारांना मनाई केली असताना व्यापा-यांना जननजीवन बंदिस्त करून कर्फ्यू लावण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यू मुळे ही साखळी तुटेल असे अतार्कीक आणि अशास्त्रीय कारण व्यापा-यांनी दिले आहे.मुळात कोरोना बाधित रुग्णा कडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका हा दोन आठवडे असतो.असा दावा इंपिरियल कॉलेज इंग्लंडच्या शास्त्रज्ञानी दिला आहे.तसा प्रबंध देखील न्यू इंग्लड जनर्ल ऑफ मेडिसिनच्या वतीने प्रकाशित झाला आहे.अमेरिकन शास्त्रज्ञानी कोरोना विषाणू वेगवेगळ्या पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहतो ह्यांचा शोध घेतला आहे.पब्लिक हेल्थ आणि बायोटेटिक्सचे संशोधक अनंत भान आणि जागतिक आरोग्य संघटनेचे उच्च आरोग्य तञ् माईक रयान ह्यांनी तर जनता कर्फ्यू मुळे कोरोना संसर्ग साखळी खंडित होत नसून जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊन उठविल्या नंतर संसर्गवाढीचा अधिक धोका असल्याचा इशारा दिला आहे.प्रभावी आणि आधुनिक आरोग्य यंत्रणा, बाधितांचा तपास आणि त्यांचे संपर्कातील व्यक्तीची ओळख करून त्यांचे विलगीकरण अर्थात ‘चेस द वायरस’ हा कोरोनाला हरविण्याचा मूळ मन्त्र सांगितला आहे.आरोग्य क्षेत्रातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि तज्ञ लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यू सारख्या अशास्त्रीय उपायांना मान्यता देत नसताना हे खुळ कुणाच्या सुपीक डोक्यातून आलेले आहे, ह्याचा तपास लावण्याची मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
अकोल्यात आज पर्यंत ६८१४ रुग्ण रोजी पॉझिटीव्ह रुग्ण आढळले त्यामधून ४७९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आणि त्यांना डिस्चार्ज दिला गेला आहे. त्यामुळे दाखल असलेले ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण केवळ १८११ आहेत.ते देखील सर्वच गंभीर किंवा अतिगंभीर नाहीत.असे असताना अचानकपणे व्यापा-यांच्या संघटना ऑनलाईन बैठक घेऊन जनजीवन ठप्प करणारा निर्णय घेतला जातो.त्याला जिल्हा प्रशासन आणि पोलिस तसेच जनप्रतिनिधींचे समर्थन असल्याचे अधिकृत पत्रक काढून जाहीर केले जाते.आधीच पाच महिन्याच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, लहान मोठे व्यापार डबघाईला आलेले आहेत.नागरिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.अश्यावेळी कोरोनाचा बागुलबुवा करीत मोठ्या व्यापा-यांनी जनता आणि लहान व्यापारी, व्यावसायिक ह्यांची कोंडी करण्यासाठी जनतेला वेठीस धरणारा निर्णय घेतला आहे.पाच दिवसाच्या जनता कर्फ्यू २३ तारखेला जाहीर केल्याने जिल्ह्यात जीवनावश्य्क वस्तू खरेदीसाठी गर्दी वाढून काळाबाजारी वाढणार आहे.केंद्र सरकारच्या मान्यतेशिवाय लॉक डाऊन आणि जनता कर्फ्यू लावता येत नसताना गोरगरीब जनतेला नाहक वेठीस धरू नये अशी अपेक्षा देखील वंचितने व्यक्त केली आहे.