पातूर (सुनिल गाडगे)
पातूर येथील महात्मा फुले आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयात असलेला व्यवस्थापन मधील वाद विकोपाला गेला असून पातूर पोलिसात मंगळवारी परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत
यामध्ये फिर्यादी एक प्राध्यापक महिला यांनी अध्यक्ष मानसीक त्रास देतात महाविद्यालयात कर्मचारी यांना पगार देत नाहीत पगार दिला नाही म्हणून प्राध्यापक व कर्मचारी यांनी एक दिवस संप पुकारला होता त्या एक दिवसाचा पगार कपात केल्याने पगार कपात का केला विचारण्यास गेले असता आरोपीने फिर्यादी महिलेला लोटलाट करून विनयभंग केला तसेच शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली यावरून संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोचरे,संस्थेचे सचिव हरिष बोचरेयांच्या विरुद्ध अपराध518/20कलम354,504,506,नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तसेच महाविद्यालयातील कर्मचारी यांच्या गैरवर्तणुकीबाबत संस्थेचे अध्यक्ष सुभाष पांडुरंग बोचरे यांनी तक्रार दिली आहे त्यामध्ये महाविद्यालयात सकाळी11:30वाजता उपोषणाला बसलेल्या कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस संस्थेच्या डाकद्वारे देण्यासाठी महाविद्यालयातील शिपाई व दुसरा शिपाई पवन काळपांडे पंकज मंडघे याना सांगून पत्र घेण्यासाठी बोलावले असता डॉ. गजानन रोडे ग्रंथपाल यांना पत्र दिले असता त्यांनी वाचून घेण्यास नकार दिला व सर्व कर्मचारी वाद घालत होते यामध्ये डॉ. सुवर्णा डाखोरे,डॉ. अस्मिता खांबरे यांनी अंगलट येण्याचा प्रयत्न केला मी दुरून बोला असे ओरडुन सांगत होतो मात्र ऐकण्यास तयार नव्हते त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य आले व त्यांनी मध्यस्थी केली सदर कृत्य हे संस्थेच्या अध्यक्ष यांचे सोबत गंभीर गैर वर्तणुकीचे आहे यामध्ये चौकशी करून मला न्याय द्यावा अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोचरे यांनी पातूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे या तक्रारीच्या प्रती त्यांनी कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, सहसंचालक उचचशिक्षण अमरावती विभाग अमरावती, प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय,पातूर यांना पाठविण्यात आल्या आहेत