तेल्हारा (प्रतिनिधी)- कोरोनाचा संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी शहरातील शंभर जणांचे रक्ताचे नमुने पाठविण्यात आले असता त्यातील दहा जणांना कोरोना होऊन गेला असल्याची माहिती प्रशासन कडून मिळाली असल्याने शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत दोन हजार च्या वर नागरिकांना कोरोना होऊन गेल्याचा अंदाज प्रशासन कडून वर्तविला जात आहे
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था दिल्ली ने भारतात कोरोनाच्या संसर्ग स्थिती जाणून घेण्यासाठी भारतातिल 80 जिल्हे निवडले त्यामध्ये अकोला जिल्हा चा समावेश असल्याने तालुक्यात 10 सप्टेंबर रोजी शहरातील 100 जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले या मध्ये कोरोना योद्धे समजले जाणारे अधिकारी ,कर्मचारी, बँकेचे कर्मचारी पोलीस ,डॉक्टर,पत्रकार ,व नागरिक यांचा समावेश असलेल्याचे कुटुंबातील एक सदस्य या प्रमाणे नमुने घेण्यात आले यामध्ये 10 जणांना कोरोना होऊन गेला असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र सुरडकर मुख्याधिकारी मनोहर आकोटकार, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ अशोक तापडीया यांनी दिली यावरून 2005 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या चोवीस हजार असल्याने दहा टकके म्हणजे दोन हजार चारशे नागरिकांना कोरोना होऊन गेला असल्याचा निष्कर्ष या अहवालातुन काढण्यात आला आहे
या सर्वेक्षण मधून भोगोलिक दृष्य जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रत्येक भागाची स्थिती पाहून तपासणी अंती सामूहिक संक्रमण स्थिती आणि नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती पाहून किती टक्के नागरिकांच्या शरीरात प्रतिजैविक पेशी तयार झालेल्या आहेत लोकांची टक्केवारी किती आहे जेणेकरून भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थिती चा अंदाज आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला आणखी सतर्क राहण्याचा असतो.