पातूर (सुनिल गाडगे):
पातुर नगरपरिषद च्या वतीने शहरात कोविड १९ या संसर्गजन्य आजारा वर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात
“माझे कुटूंब माझी जवाबदारी”
हा उपक्रम सुरू करण्यात आला.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागातील प्रत्येक घरातील लहान मुलां पासुन ते मोठ्या जेष्ठ नागरीकांपर्यत सर्वांच्या आरोग्याची तपासणी थर्मोमिटर व आॅक्सीपल्स डिजीटल मिटरने करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक दोन मध्ये याची सुरवात करण्यात आली.येथील नागरीकांनी स्वयंम प्रेरणेने स्वत:च्या कुटूंबातील सदस्यांची तपासणी करून घेत या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगरपरिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.नारायण झाडोकार नगरपरिषद कर्मचारी विनोद माहुलीकर , जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले आणी सामाजिक कार्यकर्ते ठा.शिवकुमारसिंह यांनी स्वयंम प्रेरणेने सहभाग नोंदवला
आहे
पातूर नगर परिषद चे 11कर्मचारी कोरोना बाधित निघाले त्यामुळे हा उपक्रम गतिशील करण्यात आला आहे
तपासणी मोहीम मध्ये नागरिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पातूर नगर परिषद च्या वतीने करण्यात आले आहे