अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग पाहता आता प्रशासनाच्या हातात हात घेऊन सर्व स्तरातील जनता पुढे सरसावत आहे , अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटकांना सामील करून घेत नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो बुक ह्या नंतर आता अकोला शहरातील बाळापूर रोड वरील सर्वात मोठा ठोक किराणा व धान्य बाजार असलेल्या मार्केट मध्ये आता प्रत्येक दुकानात” बिना मास्क कोई व्यवहार नही” हा उपक्रम सुरू केला असून न्यू किराणा व धान्य बाजार संघटनेचे पदाधिकारी कासम भाई डोडिया, चंचल भाटी, सलीम भाई डोडिया, राजकुमार राजपाल, गणेश गुरबाणी, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, मधुभाई भीमजियानी व त्यांचे सहकारी व स्वतः पोलीस निरीक्षक शेळके ह्यांनी प्रत्येक ठोक दुकानात जाऊन दुकान मालकाला कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर व मास्क चे महत्व सांगून ” नो मास्क नो डील” ह्या मोहिमेत सहभागी होऊन स्वतः ही मास्क घालावा व दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सामाजिक अंतर व मास्क चा आग्रह करावा व न ऐकनाऱ्या ग्राहकां सोबत कोणताही व्यवहार करू नये अशी विनंती करण्यात आली, सर्व दुकानदारांनी ह्याला मान्यता देऊन ह्या मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन शासनाच्या मेरा परिवार मेरी जबाबदारी ह्या धर्तीवर आपले योगदान देण्याचा निश्चय केला।