अकोट (देवानंद खिरकर)- अकोला जिल्हा पोलिस दलाकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतून “सर्व धर्माची शिकवण एकच” हा उपक्रम दि. २१ सोमवारला अकोट शहर पोलीस स्टेशनच्या सावली सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या “सर्व धर्माची शिकवण एकच” यावरील मार्गदर्शनाने उपस्थित नागरिक भारावले.प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे, शांतता व जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा हा मुख्य उद्देश या उपक्रमाचा असून जातीय सलोखा टिकून राहावा प्रत्येक धर्माची शिकवण एकच असून ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी याच उदात्त हेतूने आज अकोट शहर पोलीस स्टेशनला हा उपक्रम राबविला गेला
या कार्यक्रमाला व्यासपीठावर अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, गुरुदेव सेवा आश्रम पाटसुल चे उद्धवजी गाडेकर महाराज,अकोट येथील चर्चचे फादर विशाल वेंगस,श्रीकृष्ण सावळे गुरुजी, शेख रऊफ शेख इस्माईल गुरुजी, इश्तियाक अहमद,अकोट शहर ठाणेदार संतोष महल्ले यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार संतोष महल्ले यांनी केले.फादर विशाल वेंगस यांनी आपल्या मार्गदर्शनात माणूस माशाप्रमाणे पाण्यामध्ये पोहायला शिकला आहे,पण माणूस माणसा प्रमाणे या जगामध्ये जगायला विसरला आहे.माणसाने मानवता जपावी आपल्या सतकार्याने माणूस मोठा होतो, प्रत्येकाने माणुसकी जपणे आज महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले,तर गुरुदेव सेवा मंडळाचे शेख गुरुजी यांनी माणूस कपड्यांनी किंवा रंगाने नाही तर माणूस माणुसकीने मोठा होतो कोणाला धर्म न विचारता त्याला ज्ञान विचारा ज्यात सत्यता असेल असे माणसाला ज्ञान मिळाले तर तो भेदभाव करणार नाही,तर श्रीकृष्ण सावळे गुरुजी यांनी ग्रामगीतेत एकच धर्म सांगितला आहे आणि तो म्हणजे मानवता धर्म.त्याचे पालन होणे आवश्यक आहे,तर इश्तियाक अहमद यांनी आपण सर्व एक आहोत, जगण्यासाठी सृष्टीतून सर्व एकच ऑक्सिजन घेत आहोत तर आपण वेगळे कसे.म्हणून “इन्सानियत” खूप आवश्यक आहे असे प्रतिपादन केले तर उद्धवराव गाडेकर महाराज यांनी ग्रामगीता सर्व धर्माचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये माणसाला माणूस बनवण्याचे तंत्र आहे.ज्याने ग्रामगीता वाचली तो भेदभाव समूळ विसरल्याशिवाय राहणार नाही.म्हणून ग्रामगीता घराघरात पोहोचली पाहिजे. इथे येण्याची सर्वांना परवानगी आहे “सबके लिए खुला है मंदिर ये हमारा” अतिशय मोजक्या आणि ओघवत्या शब्दांत त्यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाला माजी आमदार संजय गावंडे,नगराध्यक्ष हरीनारायन माकोडे, व शांतता समितीचे सर्व सदस्य, पत्रकार बांधव,शहर पोलीस स्टेशन कर्मचारी व गावातील गणमान्य व्यक्ती आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपनीय विभागाचे रणजीत खेडकर,उदय शुक्ला व पो स्टे चे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन गोपाल गांधी यांनी तर आभार निलेश गाडगे अकोला यांनी मानले सद्भावना प्रतिज्ञा घेऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.