अकोला(प्रतिनिधी)-जागतिक महामारी करोना चे संक्रमण रोखण्यासाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी, महानगरपालिका , महसूल कर्मचारी तसेच पत्रकार ह्यांनी जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम केले प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली, फक्त महाराष्ट्रात आज पर्यंत 20,000 चे वर पोलीस बांधव करोना संक्रमित झाले असून 200 चे वर पोलीस बांधव कोरोनाशी दोन हात करतांना शाहिद झाले आहेत, ह्या करोना योध्यानचा सन्मान व्हावा त्यांचे कार्य चित्र रूपाने सर्व सामान्य नागरिकांना समजावे तसेच युवा शक्तीला करोना योध्यानबद्दल चा आदर चित्र रूपाने जनते समोर यावा म्हणून अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे संकल्पनेतून शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके व बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय, रोटरी क्लब अकोला, दिव्यान्ग आर्ट गॅलरी व जे सी आय अकोला ह्यांचे सहकार्याने पोलीस मुख्यालयाच्या आवार भिंतींवर ढोणे चित्रकला महाविद्यालयाच्या तरुण चित्रकारांनी करोना योध्याचे करोना काळात त्यांनी केलेल्या कामगिरीचे व त्या माध्यमातून जनतेला करोना विषयी जागृती करणारा संदेश चितारले ह्या प्रकल्पा साठी बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे, रोटरी क्लब अकोलाचे उदय वझे, अध्यक्ष सीए घनश्याम चांडक, दिव्यान्ग आर्ट गॅलरी चे विशाल कोरडे, व जे सी आय अकोला न्यू प्रियदर्शनी च्या अध्यक्षा आरती पनपालिया ह्यांचे सहकार्य लाभले।