तेल्हारा – चोरीच्या घटणेवर आधारित अन पोलिसांना चकमा देणाऱ्या “बंटी और बबली” हा सिनेमा ज्यांनी बघितला असेल त्यांना तो सीन नक्की आठवत असेल. महाठग असलेले बंटी आणि बबली हे दोघे एका एनआरआय ला शेंडी लाऊन चक्क ताजमहाल विकतात. तो सीन बघताना जरी मजा येत असली तरी ही कल्पना अतिशयोक्त आणि वेगळी आहे हे आपल्या डोक्यात पक्कं असतं. अशीच बंटी और बबलीच्या जोडीने जबरी दरोड्याचा कट रचला व दरोडा टाकून पळ काढला तोच तेल्हारा व अकोट पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना अटक केली.
सिनेमातील एखादा सीन पाहून आपण नेहमीच चक्क होतो परंतु आज पहाटे तेल्हारा तालुक्यामध्ये सिनेमात घडेल असा थरारक सिन घडला. हकीकत अशि कि, तेल्हारा येथील रहिवाशी असलेला अट्टल गुन्हेगार असलेल्या एका जोडप्याने तालुक्यातील वाडी अदमपूर येथील एका दाम्पत्याच्या घरी दरोड्याचा बेत आखला. नवरा बायको व मुलगी तिघेच घरात होते, पहाटे घरात कुणी आल्याचे लक्षात येण्यापुर्वीच पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून या दोघांनी घरातील रोख रक्कम व सोन्यावर हात साफ केला.आणि तेथून पळ काढला हि घटना तेल्हारा पोलिसांना कळताच तेल्हारा पोलिसांनी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवने आणि त्यांच्या पथकाला तसेच अकोट पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड ,अकोट शहराचे ठाणेदार संतोष महल्ले,दहीहंडा पोलीस स्टेशन चे कात्रे यांना सूचित केले व तेल्हारा पोलिसांनी या दोघांचा पाठलाग सुरू केला. तेल्हारा पोलीस स्टेशनचा कर्मचारी अविनाश डाबेराव व राजेश्वर सोनोने हा पोलीस शिपाई त्यांच्या गाडीच्या अगदी मागे असतांना चालू गाडीवर मुलगी (बबली ) उलटी बसून अविनाश डाबेराव याच्यावर पिस्तुल चालविण्याचा प्रयत्न करीत होती. सुदैवाने पिस्तुलचा स्टीगर दबला नाही अन्यथा काय झाले असते याची कल्पना सुद्धा करणे म्हणजे अंगावर काटा येतो…. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून तसेच चोहीकडे नाकाबंदी असल्याने आरोपीला सुचेनासे झाले त्यामुळे अकोट तालुक्यातील पलसोद जवळ आरोपीला पिस्टल सह पकडण्यात पोलिसांना यश आले .तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांच्या तत्परतेने व अकोला पोलिसांच्या संयुक्त सदर धडक कारवाई केली आहे घटनास्थळी डॉग स्कॉट फिंगरफीन्ट टीम दाखल होऊन घटनास्थळी पाहणी केली या घटनेमुळे अनेक अशा प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता आहे.
मोबाईल ने झाला दरोडेखोरांचा घात
आरोपींनी दरोडा टाकून तेथून पळ काढला खरे मात्र फिर्यादी आणि दरोडेखोर यांचा मोबाईल सेम असल्याने चुकीने फिर्यादीचा मोबाईल घेऊन पळून गेले मात्र सदर मोबाईल आपला नसल्याचे लक्षत आल्याने पुन्हा दरोडेखोर बंटी बबली हे तिथे गेले मात्र तेव्हा पर्यंत तेल्हारा पोलिसांना याची भनक पहिलेच लागली होती त्यामुळे पोलिसांनी सदर मोबाईल ची चॉकशी करून आरोपींच्या घरच्यांना उचलले होते त्यामुळे आरोपी कोण अन हे कळून चुकले होते.
अकोला पोलिसांची तत्परता
दरोडेखोर ज्या मार्गाने गेले त्यानुसार अकोट दहीहंडा चॉहटा पोलिसांना तेल्हारा पोलिसांनी तात्काळ माहिती दिली त्यानुसार संबंधित पोलीस ठाणे अलर्ट होऊन त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच नाकाबंदी करीत पाठलाग सुरू केला आणि दरोडेखोरांना अटक करण्यात यशस्वी झाले.
मुद्देमाल शिवणी येथून हस्तगत !
दरोडेखोरांना अटक केल्या नंतर मुद्देमाल शिवणी येथे असल्याचे असल्याचे दरोडेखोर यांनी सांगितले मात्र घटना रात्री एक वाजता घडली त्यानंतर दरोडेखोर मोबाईल मुळे पुन्हा शिवणी येथून मुद्देमाल ठेऊन परत येणे शक्य नसल्याने मुद्देमाल कोन शिवणी येथे घेऊन गेला.हा प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेत अनेक जण असल्याचे बोलल्या जात असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत
दरोडेखोर यांच्याकडे पिस्टल आली कोठून
सदर घटनेत दरोडेखोर यांच्या कडून पिस्टल जप्त करण्यात आली असून तेल्हारा सारख्या शहरातील व्यक्ती कडे पिस्टल आली कोठून यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलल्या जात असून पोलिस याबाबत सुद्धा चोकीशी करीत आहेत.