अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती बच्चू कडू यांनी त्यांच्या टिष्ट्वटर हँडलवरून दिली आहे. गत काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे, आवाहनही बच्चू कडू यांनी टिष्ट्वटरवरून केले आहे.
महाविकास आघाडी सरकार मधील शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे. कालच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची चाचणी पोझिटीव्ह आली होती.
राज्यमंत्रीमंडळातील अनेक मंत्री हे कोरोना विषाणू संसर्गने बाधित होत आहेत. जनसंपर्क व सततचे जिल्ह्यादौरे यांमुळे अनेक लोकप्रतिनिधी हे देखील कोरोना विषाणूने बाधित होतांना दिसत आहेत. आज अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले बच्चू कडू हे ह्या संसर्गने बाधित झाले आहेत.
त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून पुढीलप्रमाणे माहिती दिली असून, आपल्या संदेशात त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.
माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी.’