अकोला,दि.19-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 381 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 235 अहवाल निगेटीव्ह तर 146 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज पाच मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि. 18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6421 (5250+1016+155) झाली आहे. आज दिवसभरात 20 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 35281 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 34375, फेरतपासणीचे 195 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 711 नमुने होते. आजपर्यंत एकूण 34632 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 29382 तर पॉझिटीव्ह अहवाल 6421 (5250+1016+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 146 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 146 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 141 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 52 महिला व 89 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील 25 जण, पातूर येथील 15 जण, पिंगळा येथील 10 जण, डाबकी रोड येथील सहा जण, चन्नी ता. पातूर, लहान उमरी व जीएमसी येथील प्रत्येकी पाच जण, मोठी उमरी, सिंधी कॅम्प व जठारपेठ येथील प्रत्येकी चार जण, गीता नगर, बार्शिटाकळी, हरिहर पेठ, सिरसो, गुसरवाडी व मलकापूर रोड येथील प्रत्येकी तीन जण, गौरक्षण रोड, मलकापूर, जवाहर नगर, रामदासपेठ, तेल्हारा, तोष्णीवाल लेआऊट व जूने शहर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित कुरुम, रामदास प्लॉट, खेमका सदन जि.प., दिगरस बु.,पिकेव्ही, खामखेड ता.पातूर, शिर्ला ता.पातूर, अकोट फैल, काटेपूर्णा, अकोट, कान्हेरी सरप, कौलखेड, बाजोरिया लेआऊट, बाळापूर, चोहट्टा बाजार, खदान, रमापूर, आगर, दुर्गा चौक, ब्लॅड बॅक जवळ, कॅलेक्टर कॉलनी, मानिक टॉकीज मागे, बाळापूर रोड, दुर्गा नगर, तापडीया नगर व मोबिला नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेशआहे. त्यातील मुर्तिजापूर, जीएमसी, गंगानगर, जीएमसी क्वॉटर व रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.
पाच मयत
दरम्यान आज पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात रामदासपेठ, अकोला येथील 64 वर्षीय पुरुष असून तो दि. 16 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, बार्शिटाकळी येथील 74 वर्षीय पुरुष असून तो दि. 16 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, खामखेड, अकोला येथील 57 वर्षीय पुरुष असून तो दि. 7 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, गंगानगर, अकोला येथील 66 वर्षीय पुरुष असून तो 16 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर सरस्वती अपार्टमेन्ट, सिव्हील लाईन येथील 65 वर्षीय महिला असून ती 15 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.
20 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
1521 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 6421 (5250+1016+155) आहे. त्यातील 208 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 4692 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1521 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.