नवी दिल्ली :
भारतात मागील २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ९३ हजार ३३७ झाली आहे. तर १ हजार २४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ५३ लाख ८ हजार १५ झाली आहे. यामध्ये १० लाख १३ हजार ९६४ जण सक्रिय रुग्ण आहेत. यातील ४२ लाख ८ हजार ४३२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८५ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
काल (१८ सप्टेंबर) पर्यंत कोरोनाचे एकूण ६ कोटी २४ लाख ५४ हजार २५४ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ८ लाख ८१ हजार ९११ जणांची चाचणी काल करण्यात आली, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.