मुंबई : पत्रकारांच्या राज्यव्यापी आंदोलनास आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना राज्यभरातून आठ हजारावर एसएमएस पाठविले गेले आणि जोरदार पाऊस असताना देखील राज्यातील जवळपास 300 तालुक्यात पत्रकारांनी तोंडाला काळे मास्क लावून तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करून तहसिलदार तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी एका प़सिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.. आंदोलन यशस्वी केल्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी राज्यातील तमाम पत्रकारांचे आभार मानले आहेत..
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केल्याप्रमाणे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना सुरू करावी, कोरोनानं आजारी पत्रकारांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची तात्काळ व्यवस्था व्हावी आणि पत्रकार संतोष पवार आणि पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस जबाबदार असणारयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राज्यातील पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार आज राज्यभर आंदोलन केले.. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना प्रत्येक जिल्हयातून 200 ते 250 या प़माणे आठ हजारांवर एसएमएस पाठवून पत्रकारांनी आपल्या तीव़ भावना व्यक्त केल्या.. “आम्ही कोरोना यौध्दे आहोत ना? मग आमची काळजी घ्या, दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाख आणि पत्रकार विमा योजना तात्काळ सुरू करा” अशी विनंती एसएमएस वदारे करण्यात आली..
सर्वत्र पाऊस कोसळत असताना देखील राज्यातील 300 तालुक्यात पत्रकारांनी तोंडाला काळे मास्क लावून तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिली. असंख्य पत्रकारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून आपल्या भावना कळविल्या..
वरील सर्व मागण्यांसंदर्भात राज्यातील पत्रकारांच्या भावना किती तीव्र आहेत याची जाणीव सरकारला झाली असेल आणि त्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांची लगेच पुर्तता होईल अशी अपेक्षा एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे..
अत्यंत अल्प काळात आवाहन केल्यानंतरही राज्यातील पत्रकारांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, सोशल मिडिया सेलचे प्रमुख बापुसाहेब गोरे, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी राज्यातील तमाम पत्रकारांचे आभार मानले आहेत.