अकोला (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सध्याची वाढती संख्या पाहता हे संकट दीर्घकाळ चालेल असे दिसते या स्थितीत प्रशासनाने तात्काळ काही उपाय योजना आखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते जिल्ह्यात सरकारी निमसरकारी तसेच खासगी संस्थांच्या इमारती प्रशासनाने ताब्यात घेऊन त्या कोविड सेंटर म्हणून तात्पुरत्या स्वरूपात उपयोगात आणाव्या सर्वोपचार रुग्णालय व सध्या उपलब्ध असलेल्या खासगी रुग्णालयांवर क्षमतेपेक्षा दुप्पट ताण आलेला आहे त्यामुळे वैद्यकीय सेवे अभावी बरेच रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत.
जिल्ह्यातील शाळा ,कॉलेज ,वसतिगृहे, क्रीडा संकुल ,मंगल कार्यालय आदी इमारतींचे “कोविड केअर सेंटर” मध्ये रूपांतर करून या ठिकाणी वैद्यकीय सुविधा व देखरेखीसाठी जिल्ह्यातील आयुर्वेद,होमिओपॅथी व नर्सिंग महाविद्यालयांचा स्टाफ तसेच खाजगी वैद्यकीय सेवा पुरविणारे डॉक्टर्स यांना रुग्णांच्या सेवेसाठी तात्पुरते नियुक्त करावे यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या संस्थेची सुद्धा मदत प्रशासनाने घ्यावी व या ठिकाणी मूलभूत वैद्यकीय उपकरणं सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड महेश गणगणे यांनी केली आहे.
या तात्पुरत्या कोविड सेंटरमध्ये कमी तीव्रतेचे लक्षण असलेल्या रुग्णांची किमान सोय होईल व इतर खूप गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल करावे.जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेऊन या स्थितीमध्ये किमान ५०० नवीन खाटा उपलब्ध केल्या तरच या कोरोना महामारी ला प्रशासन तोंड देऊ शकेल अन्यथा गंभीर स्वरूपाचे परिणाम नजीकच्या काळामध्ये दिसून येतील असेही ॲड महेश गणगणे म्हणाले. या मागण्यांच्या बाबतीत युवक काँग्रेस राज्य व केंद्र सरकारकडे सुद्धा पाठपुरावा करणार आहे.