अकोट(देवानंद खिरकर )- आकोट तालुक्यातील रंभापुर व चंडीकापुर येथील काही शेतकरी हे कोकण ग्रामीण बँक शाखा अकोट या बँकेचे खातेधारक असून त्यांना शेती कर्जाबाबत बऱ्याच दिवसांपासून अनेक अडचणी होत्या.त्यासंदर्भात आज संबधित बँकेतील खातेधारक शेतकऱ्यांनी शिवसेना गटनेते नगरसेवक मनीष रामाभाऊ कराळे यांची भेट घेतली व आपल्या असलेल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या असता कर्तव्यदक्ष नगरसेवक मनीष कराळे यांनी त्यांच्या समस्यांची दखल घेत क्षणाचाही विलंब न करता संबधित शेतकऱ्यांसोबत बँकेला भेट दिली.व बँक मॅनेजर धर्मपुरी साहेब यांच्यासमोर शेतकऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा करत त्यांचे प्रामाणिक प्रश्न मांडले असता बँक मॅनेजर यांनी सहकार्याची भावना ठेवत संबधित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे सांगून समस्या सोडवून दिल्या व उपस्थित शेतकरी व शिवसैनिकांना आश्वासित केले की यापुढेही जर शेतकऱ्यांच्या काही समस्या असल्या तर त्यासाठी बँकेतील प्रत्येक कर्मचारी व मी त्या समस्या सोडवून देईल व शेतकऱ्यांना सदैव सहकार्य करणार.यावेळी नगरसेवक मनीष रामाभाऊ कराळे यांनी बँक मॅनेजर यांचे आभार मानले तसेच शेतकरी सुद्धा बँक शाखेला सहकार्य करतील असे आश्वासन दिले. शिवसेना ही सदैव शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे प्रतिपादन केले.प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी नगरसेवक मनीष कराळे व जेष्ठ शिवसैनिक विजय ढेपे,सागर गीते यांचे आभार मानले.यावेळी शेतकरी संदीपपाल महाराज गीते,धीरज गीते,सूरजदादा गीते,मंगेश गीते,राजविलास गीते,राजूभाऊ वंजारी,नामदेव चवरे,धीरज गीते,कुंदन गीते,निरंजन मेश्राम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.