तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हुनुमान सागर प्रकल्प(वान धरण)चे दरवाजे उघडण्याच्या तयारीत वान प्रकल्प प्रशासन असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील वान धरणाच्या पातळीत सातत्याने पाण्याची वाढ होत असल्याने धरण हे ८७.२६% भरले असून पावसाची परिस्थिती बघता धरणात जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने केव्हाही धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे सहायक अभियंता वान प्रकल्प यांनी तेल्हारा तहसीलदार व संग्रामपूर तहसीदार यांना कळवले आहे.तरी नदीकाठच्या नागरीकानी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.