हिवरखेड(प्रतिनिधी)- येथील सदाशिवराव संस्थानवर गावातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोविळ९९ मध्ये मुत्यु झालेल्या पत्रकार बांधवाना आदरांजली वाहून निधन झालेल्या पत्रकार बांधवांच्या कुटूंबियांना शासनाने विम्या द्वारे त्वरित मदत करावी अशी मागणी येथील पत्रकार संघाने केली,
पत्रकार हा जगाचा चौथा आधार स्थंभ आहे,तसेच या कोरोना काळात वेगवेगळ्या पेपर चायनल,पोर्टल चे पत्रकार नागरिकांन समोर वेगवेगळ्या योजनेच्या, बेरोजगारांच्या समस्या ,सोडण्याच्या बातम्या प्रकाशित करतात ,तसेच या कोरोना मध्ये कोरोनाचे संकट टळलेपाहिजे मनुन पत्रकार धावपळीने शर्यतिचे काम करीत आहेत,आपला स्वतःचा जीव संकटात घालून जगासमोर गोर गरिबांचे विचार मांडतात,
आणि अशाच निर्भीड पत्रकारांचा कोरोनात मुत्यु होते,
तरीही शासन मात्र या पत्रकाराच्या कुटूंबियांना काहीच मदत करत का नाही? असा प्रशन निर्माण झाला आहे,
असे मोलाचे विचार हिवरखेड पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार संदीप इंगळे,
धीरज बजाज, राजेश पांडव, जितेश कारिया, राहुल गिर्हे,उमर बेग, सूरज चौबे,
अध्यक्ष अर्जुन खिरोडकार यांनी मांडले असून, कोरोना मध्ये मुत्यु झालेल्या पत्रकार बांधवांना खऱ्या अर्थाने मौन धारन करून श्रद्धांजली वाहिली,
व या पत्रकार बांधवांच्या कुटूंबियांना तात्काळ शासनाने मदत करावी अशी यावेळी मागणी सुद्धा केली,
आणि कोरोना पासून सर्वानी आपला व कुटूंबियाचा बचाव करावा असे आव्हान केले