तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा नगर पालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल धारक लाभार्थ्यांना त्रास न देता ज्यांच्या कड़े खरेदी आहे स्वतःचे घर असल्याचा पुरावा आहे अश्या सर्वाना विनाविलंब लाभ देण्यात यावा अशी मागणी तेल्हारा शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना १६ सेप्टेंबरला निवेदन देऊन करण्यात आली .
ज्यांच्या कड़े घराची खरेदी आहे , स्वतःचे घर असल्याचा पुरावा आहे जे घर टक़्स भारतात तसेच नगर नगरपालिकेने ज्यांच्या कडून अर्ज मागवून घेऊन आपले पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर जाले असल्याचे पत्र दिले अश्या सर्वाना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी पालिका अधिकारी व पदाधिकारी यांची होती परंतु तसे जाले नाही
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तेल्हारा शहरातील बहुतांश लाभार्थ्यंना आपल्या नगर पालिकेत अंतर्गत अद्याप लाभ मिळाला नाही . आपल्या पालिके अंतर्गत आपण पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अनेकांजवळून अर्ज भरून घेतले . व त्यांना आपले घरकुल मंजूर झाल्या बाबत चे पत्र सुद्धा दिले आहे परंतु सदर पात्र लाभार्थ्यांना अद्याप पर्यंत योग्य ती कार्यवाही करून लाभ दिला नाही त्यामुळे ते पात्र लाभार्थी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल पासून वंचित राहत आहेत हा त्यांच्यावर अन्याय होत आहे . सदर पात्र लाभार्थ्यांनी आपल्या सुचेना नुसार अर्ज भरण्याकरिता अर्जाचा खर्च ,नकाशे काढण्याकरिता खर्च हे सर्व करताना त्याना झालेला मानसिक आर्थिक त्रासामुळे सदर लाभार्थीचे खच्चीकरण झाले आहे . तरी आपण ज्या नागरिकांनी घरकुल साठी अर्ज केले आहे त्या सर्वांना लाभ देण्यात यावा त्या सर्व अर्जदारांना येत्या आठ दिवसाच्या आत योग्य ती कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करून घरकुल धारकाना लाभ देण्यास वेळकाढू धोरण अवलंबल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला निवेदनावर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के , युवा सेना जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे , सुनील खरोडे , माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर सह आदिनच्या सह्या आहेत