तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा न प पालिकेकडून सुरू असलेल्या पाईपलाईन च्या कामात वेधकाढु धोरण ठेवत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने न प च्या दालनात आज ठिय्या आंदोलन केले.
वेळोवेळी समस्यांबाबत सांगून सुद्धा न प प्रशासन दखल न घेता वेढकाढु धोरण ठेवत असल्याने आज शहरातील नाथ नगर येथील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.यामध्ये गेल्या दोन ते महिन्यापासून नाथ नगर मध्ये नवीन पाईपलाईन चे काम करण्यात येत आहे.त्यामुळे पाईपलाईन करीता संपूर्ण रस्ते खोदण्यात आल्याने नागरिकांना जाणे येण्यास अडचणी येत आहेत तसेच खोदलेल्या रस्त्यावरील गेल्या दीड महिन्यापासून खड्डे बुजवल्या न गेल्याने पाईपलाईन मध्ये सांडपाणी साचून ते पाईपलाईन द्वारे नागरिकांच्या घरात पोहचत आहे यामध्ये अनेक जलचर किडे पाण्यामध्ये येत असल्याने येथील नागरिकांनी वेळोवेळी न प प्रशासनाला कळवले मात्र दखल न घेतल्याने आज सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.यामध्ये संदीप बा खारोडे,अजय गावंडे,हर्षल दिघे, गोपाल पाकधूने ,अर्जुन भागीनकार,चोंडेकर,पुरुषोत्तम भारसकले,हिमांशू गावंडे, आकाश भागीनकार,शिवा आवारे यांनी ठिया आंदोलन केले.यावेळी आंदोलनाची दखल घेत नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी मध्यस्ती करीत येत्या एक दिवसात समस्या मार्गी लावून देऊ असे आश्वासन देऊन ठिया आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी न प सदस्य राजेश खारोडे,सुनील राठोड,काँग्रेस कमिटीचे प्रकाश वाकोडे,डॉ अशोक बिहाडे,सोनू मलीये,अनंत सोनमाळे,ओमप्रकाश शर्मा उपस्थित होते.