अकोट(देवानंद खिरकर )-सद्या करोनाच्या महामारीने प्रत्येकाला जेरीस आणलेले आहे,कुणाला कामधंदा नाही तर कुणाचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडलेले आहेत.शेतकऱ्यांची स्थिती तर सर्वांनाच माहीत आहे.अशाही काळात सरकार सर्वांच्या पाठमागे खंबीरपणे उभे आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षणाकरीता ऑनलाइन चा पर्यंय निवडण्यात आला आहे.अशा काळात काही विध्यार्थ्यांनी खाजगी कोचिंग क्लास मध्ये सुद्धा प्रवेश घेतलेले आहे.त्याचा अभ्यास चालू आहे, परंतु काही विध्यार्थी ठरलेला फीचा हफ्ता घरच्या आर्थिक विवंचनेमुळे देऊ शकत नाहीत.अश्या विधर्थ्यांना कोचिंग क्लास च्या काही संचालकांकडून फी भरण्यासाठी सतत फोन येतात व फी न भरल्यास तुला ऑनलाईन ग्रूपमधून काढून टाकण्यात येईल.अशी केवळ धमकीच दिली जात नाही तर ठराविक वेळेत फी न भरल्यास त्याला ग्रोउपमधून काढून सुध्दा टाकल्या जाते.तेव्हा पालक हतबल होतात, विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था सुद्धा खुप वाईट होते व मुलं निराशेच्या गर्तेत खोल जातात,अश्या स्थितीत जर एखद्या विद्यार्थ्याने आत्मघातकी प्रयत्न केला,तर त् सदोष मनुष्य वधाचा गुन्हा संबंधित संचालकांवर लागू होणार नाही का? अश्या सर्व पार्श्वभूमीवर काही पालकांनी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रा सौ.माया म्हैसने यांची भेट घेऊन व्यथा मांडली. तेव्हा याबाबीची दाखल प्रा सौ माया म्हैसने यांनी घेऊन पालकांना व विदयार्थ्यांना शांत केले.तेव्हा शिवसेना प्रवक्ते मा श्री.अरविंदजी सावंत साहेब यांच्या आदेशाने,जिल्हाप्रमुख मा आमदार नितिनजी देशमुख ,संपर्क प्रमुख मा शिरवाडकर साहेब,आ.बाजोरिया साहेब,महिला आघाडी संपर्क संघटिका मा.सौ वैशालिताई घोरपडे, सहसंपर्क संघटिका मा ज्योस्नाताई चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा सौ माया म्हैसने यांच्या नेतृत्वाखाली आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री सोनवणे साहेब यांना एक निवेदन देण्यात आले.त्यात सर्व खाजगी कोचिंग क्लासच्या संचालकांना एक पत्र देऊन ही सक्ती थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.दिलीप बोचे,महिला आघाडीच्या आकोट तालुका प्रमुख सौ हर्षा जायले, आकोट उपशहर प्रमुख सौ वर्षा करुळे,नगरसेवक तथा गटनेता श्री मनीष कराळे,आदित्य म्हैसने, अक्षय जायले यांची उपस्थिती होती.