अकोला – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेत. जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकाचे आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपशिक्षण अधिकारी मुकेश चव्हाण, नगरपालिकेचे अजय गुजर आदि अधिकारी उपस्थित होते.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीमेअंतर्गंत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करावीत. या पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज 50 घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान, Sp०२ तपासणे तसेच Comorbid Condition आहे का याची माहिती घेण्यात येईल, ताप, खोकला, दम लागणे, Spo२ कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या Fever Clinic मध्ये संदर्भित करण्यात येईल. Fever Clinic मध्ये कोवीड-19 प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील, कोमॉर्बीड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीत संदर्भित केले जाईल, प्रत्येक पाच ते 10 पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देईल, घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोवीड, कोवीड आणि पोस्ट कोवीड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावुन सांगेल.
मार्गदर्शक सूचनामध्ये नमुद केल्यानुसार लोकसंख्येनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, शहर व गाव येथे आरोग्य पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण देणे आणि साहित्य वाटप करावे, प्रत्येक 5-10 पथकामागे एक डॉक्टर निश्चित करावा व तसे आदेश निर्गमित करावे, कोमॉर्बीड रुग्णांच्या उपचारासाठी, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, किडनी विकार इ. आजारासाठी प्रोटोकॉलनुसार लागणारी औषधींचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्र,व रुग्णालय स्तरावर उपलब्ध करावा. साठा कमी असल्यास NHM च्या Free Medicine निधीतून खरेदी करावी, ताप उपचार केंद्र (Fever Treatment Center) प्रत्येक ccc, CHC, DCH मध्ये कार्यान्वित करावे. याठिकाणी संदर्भित होणा-या रुग्णांना संशयीत रुग्ण कक्षात दाखल करुन कोवीड- 19 चाचण्या कराव्यात. प्रत्येक तालुक्यात किमान एक ताप उपचार केंद्र कार्यरत असणे आवश्यक आहे, आवश्यकतेनुसार व नवीन ccc,CHC व DCH स्थापन करण्यासाठी नियोजन करावे, ऑक्सजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करावे, संशयीत कोवीड-19 रुग्णांना कडून FTC मध्ये आणण्यासाठी प्रत्येक दोन-तीन प्रा.आ.केंद्रा मागे किमान एक रुग्णवाहिकाची सोय करावी, लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेवीका यांचा या मोहीमेसाठी सहभाग घ्यावा.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही कोविड-19 साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची असल्याने ही मोहिम यशस्वी राबविण्याऱ्या व्यक्ती व संस्थेना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, महानगरपालिकास्तरीय व आमदार मतदार संघ स्तरावर बक्षीस देण्यात येणार आहे. व्यक्तीसाठी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, आरोग्य शिक्षण मॅसेजेस स्पर्धा घेण्यात येतील. तर संस्थाना त्यांच्या कामकाजानुसार बक्षीस देण्यात येईल. तरी नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.