तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा नगर परिषदेच्या माध्यमातून ७२,४०,४४६/- रुपयांचे हिंदू स्मशानभूमी आवार भिंत व विकास कामे तसेच ७२,७१,६११/- रुपयांचे मुस्लीम कब्रस्थान आवार भिंतीचे व विकास कामे चालु असतांना कामांमध्ये संबंधित ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याबाबत तक्रार कर्त्यानी आपणास (मुख्याधिकारी)व नगर परिषद, तेल्हारा अध्यक्षा यांना लेखी तक्रार करून तसेच तोंडी सांगून कळविले होते. होत असलेला भ्रष्टाचार थांबवण्याची विनंती केली होती, परंतु तरी सुद्धा त्यांनी सदर कामात भ्रष्टाचार केलाच.
सदर दोन्ही कामांमध्ये आवार भिंती करिता जे खड्डे खोदावे लागतात ते अंदाज पत्रकाप्रमाणे खोदल्या गेले नाहीत. वस्तुस्थिती, अंदाजपत्रक व एम बी रेकॉर्ड मधील घेतलेले मापे यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. अंदाजपत्रका प्रमाणे इतर कामे झाले नसल्याचे तक्रार कर्त्यानी खात्रीपूर्वक सांगितले आहेत तसेच हिंदू स्मशानभूमीत जे पेवर्स ब्लॉक बसविण्यात आले त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आहे. पेवर ब्लॉकच्या खाली ज्या प्रमाणात मुरूम टाकावयास पाहिजे त्या प्रमाणात टाकण्यात आला नाही. कोठे कोठे तर मुरुमच टाकण्यात आला नाही. पेवर ब्लॉकचे काम सुद्धा अंदाज पत्रकाप्रमाणे झाले नाही. त्यामुळे याकामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला आहे.
सदर सर्व काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे हे तक्रार कर्त्यानी सांगितले आहे . तरी आपण सदर कामांची आपल्या स्तरावरून विनाविलंब चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी व
भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण पाठीशी घालणार नाही, सदर कामांची विनाविलंब चौकशी करून कारवाई न केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल.असा इशारा सुध्दा देण्यात आला होता तसेच निवेदनाच्या प्रती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना . अशोकजी चव्हाण , पालकमंत्री मा. ना. बच्चूभाऊ कडू , मा.आ.
गोपीकिशनजी बाजोरिया , मा.आ.डॉ. रणजित पाटील साहेब ,मा. आ. अमोलदादा मिटकरी यांच्याकडे पाठविण्यात आल्यात त्यामुळे तक्रार कर्त्यानी केलेल्या भृष्टाचारच्या कामा बाबत एक चौकशी समिति गठित करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.