अकोट ( देवानंद खिरकर)-लोहारी मुंडगाव ते बेलखेड हा रस्ता अकोट व तेल्हारा दोन तालुक्यांना जुडलेला असल्यामुळे या रस्त्याने दिवस-रात्र वाहतूक सुरू असते. या मुख्य मार्गावरील गेल्या कित्येक महिन्यापासून काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.या मार्गावरील जड वाहन आल्यास दुचाकी,सायकल स्वारीपायदल,ऑटोचालक यांना साईड घेण्यास सुद्धा जागा उरलेली नाही.या मार्गाने रात्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात सतत वाहनांची वर्दळ असल्यामुळे रात्रीच्या सुमारास हे काटेरी झुडपे.वाहनधारकांच्या लक्षात न आल्यास फार मोठा अपघात घडू शकतो तरी या मुख्य मार्गावरील काटेरी झुडपे तोडावी अशी मागणी वाहनधारक व गावकरी करत आहेत या काटेरी झुडपामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे हे नाकारता येत नाही.