पातुर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सुकळी येथे एकाच गावात राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची कुर्हाडीने वार करून हत्या केली. कुऱ्हाडीने मारल्यानंतर आरोपीने आपला मित्र जिवंत आहे की मृत पावला याची शहानिशा न करता त्याला जाळण्याचा प्रयत्न केला.यामधील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की पातुर तालुक्यातील ग्राम सुकळी येथे राहणारा विकास बाबूसिंग राठोड व राजाराम तुकाराम हिवराळे हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. सोबतच कामाला जात होते. यापूर्वी त्यांचे काहीवेळा लहानसहान वादही झाले होते तरीही दोघांमधील मैत्री कायम होती. रविवारी हे दोघे एका शेतात कामासाठी गेले होते. काम करीत असताना या दोघांमध्ये शिल्लक कारणावरून काहीतरी वाद झाला. या वादातून विकास राठोड याने राजाराम हिवराळे याचे वर कुर्हाडीने वार केले. या वारांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व जमिनीवर कोसळलेल्या राजारामला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूचा काडीकचरा जमा करून व त्याच्या अंगावर दारू टाकून त्याला पेटवून दिले. परिसरातील लोकांना धूर दिसल्याने ते धावून आले, तेव्हा हा सगळा प्रकार त्यांना दिसला. लोकांनी राजारामला वाचविण्यासाठी जाळ विझविला व त्याला बैलगाडीत टाकून गावाकडे नेले गावातून तात्काळ अकोला येथे हलवण्यात आले मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली, अकोला येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दरम्यान विकास राठोड याने घटनास्थळावरून पोबारा केला.होता गावातून तो पळून जात असल्याची माहिती चांन्नीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पद्माकर पातोंड यांना मिळाली त्यांनी आपल्या सोबत पोलीस कर्मचारी आदिनाथ गाठेकर रावसाहेब बुधवंत किरण गवई संतोष जाधव यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले दरम्यान प्राप्त माहितीनुसार आरोपी विकास राठोड हा थोडा विक्षिप्त असून त्याच्यावर यापूर्वीसुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचे काही गुन्हे चांनी पोलिसात दाखल आहेत. या घटनेची माहिती चान्नी पोलिसांना मिळाली. एका माहितीदाराने दिलेल्या गुप्त माहितीवरून आरोपी विकास राठोड हा कोठे लपलेला आहे, त्याचा सुगावा पोलिसांना मिळाला. तेव्हा चान्नी पोलीस ठाण्याचे एएसआय गाडेकर, पद्माकर पातोंड, यांच्यासह किरण गवळी, पोकाॅ. रावसाहेब बुधवत, सुधाकर करवते, गौरव खत्री, संतोष जाधव यांनी पद्धतशीरपणे सापळा रचून आरोपी विकास राठोड याला ताब्यात घेतले.