वाडेगाव(डॉ चांद शेख):- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत येत असलेल्या वाडेगवात रविवार रोजी एक पुरुषाचा अवहाल पुन्हा पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ वैशाली चुनडे यांनी सांगितले आहे या आजाराची लागण होत असल्याने ही संख्या वाढतीच आहे.त्यामुळे नागरिक पूर्णपणे भयभीत झाले आहेत.
लॉकडाऊन पासून वाडेगाव मध्ये कोरोना आजाराचा शिरकाव होत शतकाच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा गेला तर या आजारात दोघांचा मृत्यू झाला आहे.तसेच या आजारावर ८३ लोकांनी या कोरोना आजारावर मात केली असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली चुनडे यांनी सांगितले आहे.आज रोजी काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला घरीच उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे..