अकोला : – जिल्हा विधीसेवा प्राधीकरण कार्यलय अकोला येथे दिनांक ११ सप्टेंबर रोजी बालगुन्हेगारी विषयी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगुन्हेगारी विषयी परिपुर्ण तसेच कायदेविषयक उपस्थीत माहीती मान्यवरांना देण्यात आली. या कार्यक्रर्माचे आयोजन वाय . जी खोब्रागडे ,जिल्हा न्यायाधीस तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरूप बोस , सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून या वेळी प्रमुख उपस्थीती श्रीमती एस .ए. बंसोड, अध्यक्ष बालन्यायालय अकोला तथा सह दिवानी न्यायाधिस क . स्तर अकोला, श्री . जी .डी. लांडबळे, २ रे प्रथमसत्र न्यायदंडाधिकारी अकोला, श्री .ए. एस. अग्रवाल ५वे प्रथमसत्र न्यायादंडाधिकारी अकोल , अॅड. सेंगर साहेब , सदस्य बाल न्यायालय मंडळ अकोला, महीला विधीज्ञ श्रीमती बाजड, श्रीमती वर्षा रामटेके , तसेच चाईल्ड लाईन मध्ये कार्यरत सदस्य, न्यायालयीन कर्मचारी व इतर सदस्य इत्यादी उपस्थीत होते. कार्यक्रमात सोसल अंतर, मास्क, सॅने टायजर तसेच शासकीय नियमांचे पालन करन्यात आले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी स्वरूप बोस , सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला ,सज्जाद हुसेन साहेब सुप्रीटेंडन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला, राजेश देशमुक कनिष्ठ लिपीक, मोहम्मद शरीप शिपाई यांनी प्रर्यत्न केले