पातूर : (सुनिल गाडगे) तालुक्यातील तांदळी येथील सीएससी केंद्रचालकाने फिंगर प्रिंट घेऊन पैसे विड्रॉल केल्यानंतरही ते संबंधित महिलेला न दिल्याची तक्रार पातूर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तांदळी येथील निराधार महिला गिता रमेश लाहुडकार यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत पैसे जमा झालेले पैसे तांदळी येथील सीएसी केंद्रचालक माधुरी गजानन उगले यांच्या CSC (ID २५५१२६२१००१७) केंद्रावर विड्रॉल करण्याकरीता गेले असता माधुरी हिने त्यांना फिंगरप्रिंट मशिनवर बोट लावण्यास सांगितले असता त्यानंतर या महिलेने मशिनवर बोट लावल्यानंतर माधुरी उगले हिने संबंधित महिलेला तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी गिता हीने युनियन बँकेत खात्यावर पैसे जमा झाल्याबाबत चौकशी केली असता युनियन बँकेच्या मॅनेजर यांनी तुमच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पुन्हा माधुरी उगले हिला पैसे मागण्याकरीता गेले, तेव्हा माधुरी हीने तुमचे पैसे माझ्या खात्यात जमाच झाले नाहीत, तुम्ही पुन्हा येथे येऊ नका, असे सांगितले. त्यानंतर सदर महिलेने युनियन बँकेकडून स्टेटमेंट घेतले असता तिच्या खात्यातून १००० रु. काढल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याने तीने पुन्हा माधुरी उगले कडे याची चौकशी केली असता. तीने त्या दिवशीची म्ेम् ट्रान्झेक्शनचा स्क्रीन शॉट स्क्रीन शॉट दाखविला असत्या त्यामध्ये रेफरन्स नं. १५४१००४५५३५ स्पष्टपणे १००० रु. जमा झाल्याचे दाखवत असतांना सुद्धा विड्रॉल झालेले पैसे तुमचे नाहीत. तुमचे पैसे मी विड्रॉल केले नाहीत, अशी सांगत यापुढे या सीसीएसी सेंटरव तुम्ही येऊ नये म्हणून धमकावले, असे सदर महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
खेड्यापाड्यातील गरीब, अशिक्षित लोकांचा असा गैरफायदा घेऊन जर कोणी लुबाडणूक करीत असेल तर अशा लोकांवर कारवाई होणे आवश्यक आहे, अन्यथा या लोकांना पाठबळ मिळेल व अशा अशिक्षीत जनतेला लुबाडले जाईल, माधुरी हिच्या सीएससी सेंटरची संपूर्ण चौकशी करून आणखी किती लोकांसोबत हा प्रकार केला, याची चौकशी करावी, व तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून गरिबांना न्याय द्यावा, असे तक्रारीत नमूद केले आहे.