अकोट(देवानंद खिरकर) – (#COVID-19) कोराना या विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव तसेच डेंगू,मलेरिया चा वाढता प्रादुर्भाव पाहता तो रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन अकोट शहरातील कर्तव्यदक्ष शिवसेना गटनेते तथा नगरसेवक कोविड योद्धा मनीष रामाभाऊ कराळे यांनी स्वतः आपल्या प्रभाग क्रमांक ७ अकोट परिसरात निर्जंतुकिकरण औषधाची संपुर्ण फवारणी करत आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला आहे.तसेच कोरोना आजाराविषयी काय खबरदारी घ्यावी व कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी नागरीकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती केली आहे.यावेळी प्रभाग ७ मधील युवक व नागरिक यांनी विशेष सहकार्य केले.यासोबत मनीष कराळे मित्र परिवाराच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव लॉकडाऊन मध्ये अनेक गरजूंना मदतकार्य केले आहे. तर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सुद्धा सेवा दिली आहे.










