बिजिंग :
संपुर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूबाबत अनेक शंका उपस्थित होत आहे. अमेरिकासह अन्य देशांनी या या विषाणूच्या उत्पत्तीबद्दल चीनला जबाबदार धरले आहे. दरम्यान, एका चिनी महिला व्हायरोलॉजिस्ट यांनी कोरोना विषाणू मानवनिर्मित असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. इतकेच नव्हे तर त्याचे पुरावे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
व्हायरोलॉजिस्ट ली-मेंग असे त्यांचे नाव आहे. चिनी सरकारच्या धमकीनंतर त्या वास्तव्यास अमेरिकत आल्या आहेत. याचदरम्यान त्यांनी चीनवर निशाणा साधत कोरोना विषाणू हा मानवनिर्मित असुन त्याचे पुरेसे पुरावेदेखील आहेत आणि ते लवकरच मी सिद्ध करणार असल्याचे ली-मेंग यांनी म्हटले आहे. तसेच, चीनने या विषाणूबद्दल बरेच काही लपवून ठेवले असल्याचा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाल्या ली-मेंग
कोरोना विषाणुचा संसर्ग वुहानच्या मांस बाजारातून आलेला नाही, कारण मांस बाजार ही स्मोक स्क्रीन आहे, तर व्हायरस निसर्गाची निर्मिती नाही. असे सांगत त्या म्हणाल्या हा धोकादायक विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून आला आहे आणि तो मानवनिर्मित आहे. या विषाणूचा जीनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिंट सारखा आहे आणि त्याच्या आधारे हे सिद्ध होते की हा मानवनिर्मित विषाणू आहे. कोणत्याही व्हायरसमध्ये मानवी बोटांच्या प्रतिकृतीची उपस्थिती हे सांगण्यास पुरेसे आहे की, तो मनुष्याने निर्मित केलेला आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, की जरी आपल्याकडे जीवशास्त्रचे ज्ञान नाही किंवा आपण ते वाचत नाही, तरीही आपण व्हायरसचे मूळ त्याच्या आकाराद्वारे ओळखण्यास सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चीन सरकारवर निशाणा
धमकीनंतर मी हॉंगकॉंग सोडून अमेरिकेत स्थलांतरित झाले, पण माझी सर्व वैयक्तिक माहिती सरकारी डेटाबेसमधून मिटविली गेली आणि माझ्या सहका-यांना माझ्याबद्दल अफवा पसरविण्यास सांगण्यात आले. मला खोटे पाडण्यासाठी सरकार विविध प्रकारचे षडयंत्र रचत आहे. मात्र, मी माझ्या भूमिकेवरून मागे हटणार नाही, असे त्यांनी ठोसपण सांगितले आहे.
तसेच, कोरोना विषाणूचा अभ्यास करणार्या पहिल्या काही वैज्ञानिकांपैकी मी एक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यापीठातील त्यांच्या पर्यवेक्षकाद्वारे चीनमध्ये उद्भवलेल्या एसएआरएससारख्या विषयावरील विकृतींचा शोध घेण्यास सांगितले असल्याचा दावा डिसेंबर २०१९ च्या उत्तरार्धात केला होता, असे ली-मेंग यांनी म्हटले आहे.
यासोबतच, मी प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे आणि हा विषाणू मानवनिर्मित आहे हे लवकरच सिद्ध करेन. असे पुन्हा एकदा त्यांनी ठोसपणे म्हटले आहे.