तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथील सकल मराठा समाजाने सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षण स्थगितीच्या आदेशाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांचा आशीर्वाद घेऊन नवीन झुंज देण्यासाठी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. यावेळी जागतिक संकटाच्या काळात फिजिकल डिस्टन्सच पालन करण्यात आले जगातील सात आक्रमक जातीत मराठा समाज असल्यावरही शांततेचे प्रतीक म्हणून आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततेच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात ५८ लाखोंच्या स्वरूपात मूक मोर्चे काढण्यात आले एवढ्यावरच न थांबता कुठल्याही समाज व्यक्तिविशेष घटकाला त्रास न होऊ देता पोलीस प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा ताण येऊ न देता मागील ४ ते ५ वर्षांपासून सातत्याने लढा देत ४३ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती देऊन मराठा समाजावर प्रत्यक्षपणे अन्यायच केला आहे सदर आदेशाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करून मराठा समाजाला न्याय द्यावा ही मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने होत आहे यावेळी सकल मराठा समाजाचे अनुप पा.मार्के,राजकुमार शेंडे,विवेक खारोडे,अनंत सोनमाळे,ऍड.संदीप देशमुख,अजय पा.गावंडे,विक्रांत शिंदे,विजय खाडे,अतुल डीक्कर,अनिकेत बकाल,आशिष देशमुख,बजरंग खाडे, सौरभ खारोडे,श्रीकांत पाथ्रीकर,निखील देशमुख, गोकुळ म्हसाळ, इत्यादी सह मराठा बांधव उपस्थित होते.