अकोला (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील बार्शीटाकळी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी आणि कनिष्ठ सहायकाला १५ हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कौलखेड येथील प्राजक्ता कन्या शाळा खेतान नगर येथील तक्रारदार हे बार्शीटाकळी पंचायत समिती मध्ये शासकीय सेवेत कार्यरत असून ते दिर्घ रजेवर होते.रजेच्या काळातील पगार काढण्यासाठी तक्रारदार यांनी रीतसर अर्ज करून पगाराची रक्कम काढण्याची मागणी केल्यानंतर पगाराची रक्कम काढण्यासाठी बार्शीटाकळी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी गोपाल राजाराम बोंडे वय५६वर्षे आणि कनिष्ठ सहाय्यक अनंत तुळशीराम राठोड, वय३९वर्षे, रा.दगड पारवा, ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला.यांनी१५हजार रुपये लाचेची मागणी केली होती.लाचेची रक्कम तक्रारदार यांना देण्याची नसल्याने,तक्रारदार यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे केली होती. त्यातक्रारीच्या आधारे अकोला लाचलुचपत विभागाने१९जून२०२०रोजी या तक्रारीची पडताळणी केली होती.त्यानुसार १० सप्टेंबर रोजी तक्रारदाराच्या अकोला कौलखेड परिसरातील खेतान नगरातील राहत्या घरी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ हजाराची लाच घेतांना प्रभारी गटविकास अधिकारी बोंडे आणि अनंत राठोड यांना अटक केली. सदर कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेशानुसार,अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस.एस.मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण, पो. ना.अन्वर खान,पो.कॉ.राहुल इंगळे,प्रदीप गावंडे, सुनील येलोने, इम्रान,वाहन चालक सलीम खान यांनी केली.