तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून बांधकाम कामगारांची सुद्धा हीच परिस्थिती असल्याने तेल्हारा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले असून बांधकाम व्यवसायाला सुद्धा लगाम लागल्यागत परिस्थिती आहे अशातच नोंदणीकृत कामगारांना शासनाच्या वतीने पाच हजाराची मदत जाहीर केली होती मात्र मदत कामगारांच्या खात्यात जमा झालेली नसून अद्याप पहिला दोन हजाराचा व दुसरा तीन हजाराचा टप्पा कामगारांना मिळाला नाही.काही कामगारांना पाच हजाराचा टप्पा मिळाला असून आम्ही नोंदणीकृत कामगार असून सुद्धा अद्याप याचा लाभ मिळाला नसल्याने आज कामगारांनी लाभ तात्काळ देण्यात यावा अशी मागणी आज बांधकाम कामगारांकडून तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे येत्या काही दिवसात पाच हजार देण्यात यावे अन्यथा उपोषणाचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला आहे.सदर निवेदन निलेश खेट्टे बजरंग दल संयोजक तेल्हारा यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी शंकर ठाकरे,विक्रांत शिंदे,विजय हागे,किशोर गवळी ,गणेश तायडे,मंगेश गव्हाणे यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.