हिवरखेड (धीरज बजाज)- येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले किशोर गायकी यांनी भारतीय सेनेत वीस वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्यावर शेतकऱ्यांची सेवा करावी या दृष्टिकोनांतून तलाठी या पदावर कार्यरत झाले तसेच मसुदअली व अक्सी रुंनीसा या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या मुद्स्सीर अली यांना संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीची बहूमानाची डॉक्टरेट पदवी नुकतीच बहाल करण्यात आली. डॉ.मोहम्मद समीउल्ला याच्या मार्गदर्शनाखाली “ऊर्दू मकतुबाती अदब मे समाजी सरोकार हा त्यांचा शोधप्रबंधाचा विषय होता.” वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथून डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले व्यक्ती आहेत सोबतच हिवरखेड येथील मुस्लिम समाजातील सुध्दा ते पहिलेच व्यक्ती आहेत.घरी कुठलेही शैक्षणिक वातावरण नसतांना त्यांनी मिळवलेले हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे.म्हणून स्थानिक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या हिवरखेड शाखेच्या वतीने या दोघांचाही यथोचित सत्कार करण्यात आला जेष्ठ पत्रकार व मार्गदर्शन संदीप इंगळे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या समारंभात पत्रकार संघांचे शहर अध्यक्ष अर्जुन खिरोडकार, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र वाकोडे, राजेश पांडव, धीरज बजाज, जितेश कारिया, राहुल गिऱ्हे, सुरज चौबे, जावेद खान, उमर बेग,अनिल कवळकार, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील, मो. शफाकत यांच्यासह ग्रामस्थ उपस्तित होते,