अकोट(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी येथे सन 2010 ते सन 2015 या कालावधी मधे ग्राम पंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकास कामा बाबत बोर्डी मधुन जिल्हाधिकारी,पालकमंत्री,यांचेकडे लेखी तक्रार देण्यात आली होती.त्या तक्रारची मा.उपविभागीय अधिकारी अकोट यांनी बोर्डीला येवुन ग्राम पंचायत मधे सर्व रेकार्डची स्वताहा चौकशी केली व बोगस आढल्यामुळे सर्व रेकाड जप्त केले होते.व अकोटला सतत 6 महिने सुनावणी सुरु केली होती. गैरअर्जदार यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली होती.अखेर सर्वांचे लेखी युक्तिवाद घेवून प्रकरण बंद केले होते.व ग्राम पंचायत बोर्डी व ईतर पाच यांना गौणखनिज प्रकरणी 21 लाख रुपये दंड केला आहे.व झालेला 21 लाख रुपये दंड गैरअर्जदार यांचे कडून वसुलीचे तहसीलदार अकोट यांना आदेश दिले व प्रकरण वसुली करिता तहसीलदार अकोट यांचेकडे दिले आहे.जिल्हाधिकारी,पालकमंत्री यांनी सुध्दा सदर प्रकरणात वसुली व पुढिल बोजा चढवण्याची कारवाई तात्काळ करण्याचे आदेश दिल्यावर सुध्दा अकोट तहसीलदार यांनी आज परंत गैरअर्जदार 1 ते 5 यांच्या कडून कुठलीही वसुली किवा बोजा चढवण्याची आज परंत सुध्दा कारवाई केलेली नाही.व जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी दिलेल्या आदेशाला सुध्दा खो दिला आहे.अर्जदार हे सतत पाठपुरावा करित आहेत परंतू अकोट तहसीलदार हे वसुली किवा बोजा चढवन्याची कारवाई करण्यात पूर्णपणे टाळाटाळ करत आहेत. या बाबत वरिस्ठ अधिकारी यांनी दखल घेवून सबंधीत अधिकारी यांच्या विरुध्द कारवाई करावी व मला न्याय द्यावा अशी मागणी अर्जदार यांनी जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे केली आहे.