• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘कर्ज वसुली स्थगितीला २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; कोणतेही कर्ज एनपीए म्हणून घोषित करु नका’

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 10, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
सुप्रीम कोर्ट
18
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : 

सुप्रीम कोर्टाने कर्जवसुली स्थगितीला २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून कोणतेही कर्ज एनपीए म्हणून घोषित करु नये, असे निर्देश कोर्टाने बँकांना दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी २८ तारखेला होणार आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात रिर्झव्ह बँकेच्या निर्देशांनंतर बँकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत कंपन्या आणि कर्जदारांना दिलासा देत कर्जाचे हफ्ते फेडण्यास सहा महिन्यांची सूट दिली होती. ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंतच होती.

देशावर ओढावलेल्या कोरोना संकटकाळात कर्ज वसुलीवरील स्थगितीला दोन वर्षांपर्यंत वाढ मिळू शकते, अशी माहिती केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाचा दाखला देत याआधी सुप्रीम कोर्टात दिली होती.

कर्जदारांची बाजू मांडताना वरिष्ठ वकील राजीव दत्ता यांनी कोर्टाला सांगितले की, कर्जावर अजूनही व्याज आकारले जात आहे. कुठे आहे दिलासा? कर्जाची पुनर्रचना केली जात आहे, ती आधीच करायला हवी होती. सध्याच्या परिस्थितीत लाखो लोक रुग्णालयात आहेत. अनेक लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.

कर्ज हप्त्यांना स्थगिती दिली जावी तसेच या काळातले व्याज माफ केले जावे, अशी विनंती करीत असंख्य याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणावर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकांवर पुढील सुनावणी २८ तारखेला होईल, तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. कोरोना संसर्गामुळे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे, त्यामुळे सरकारने कर्जदारांच्या बाबतीत सहानभूतीची भूमिका घेत योग्य तो मार्ग काढणे गरजेचे असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.

Tags: कर्जसुप्रीम कोर्ट
Previous Post

कोरोना मुळे पर्यटन उद्योगाला ५ लाख कोटींचा फटका!

Next Post

स्वयंरोजगार प्रदर्शनी आनंद मेला, मिना बाजार त्वरीत सुरु करा,व्यवसायदारांचे पंतप्रधानांना निवेदन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे लसीकरण करण्याची मागणी

स्वयंरोजगार प्रदर्शनी आनंद मेला, मिना बाजार त्वरीत सुरु करा,व्यवसायदारांचे पंतप्रधानांना निवेदन

अवैध

अवैध गौणखनिज प्रकरणी दंड वसुली करण्यास तहसीलदारांची टाळाटाळ,तक्रारदार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.