कोरोना अलर्ट
आज गुरुवार दि. १० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२८५
पॉझिटीव्ह- ५३
निगेटीव्ह-२३२
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ५३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १६ महिला व ३७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कान्हेरी ता. बाळापूर येथील सात जण, अकोट येथील सहा जण, बार्शीटाकळी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच जण, डाबकी रोड येथील तीन जण, शास्त्री नगर, जठारपेठ, अंबुजा फॅक्टरी ता. बाळापूर, चिखलगाव येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित पाटी, नकाशी ता. बाळापूर, रामदासपेठ, देशमुख फैल, मोठी उमरी, कौलखेड, मोर्णा कॉलनी, हरिहरपेठ, तेल्हारा, सुधिर कॉलनी, दोनद खु. ता. बार्शिटाकळी, रजपूतपुरा, पारस, मुर्तिजापूर, रतनलाल प्लॉट, जूने शहर, राजेश्वर कॉलनी, रामनगर, खामखेड प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ, अकोला येथील ७१ वर्षीय पुरुष असून तो दि. २२ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात ८१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४०३५+९१६+१४७=५०९८
मयत-१७३
डिस्चार्ज- ३७२६
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-११९९
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!