तेल्हारा(प्रतिनिधी)-
शिवसैनिकांची माऊली स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त युवासेना तेल्हारा तालुक्याच्या वतीने युवासेना पदाधिकारी व युवासैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्या करीता आढावा बैठक दी. ०६/०९/२०२० रोजी युवासेना विस्तारक तथा उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे यांचा मार्गदर्शनात घेण्यात आली.
या बैठकीला सर्व प्रथम स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून सुरुवात करण्यात आली.या बैठकीत आगामी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून त्याच बरोबर या बैठकीत तेल्हारा शहरातील व हिवरखेड येथील विविध समस्या बाबत चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी युवसेनेची पुढील रूपरेषाची आखणी करण्यात आली व यावेळी युवासेना विस्तारक तथा उपजिल्हा प्रमुख राहुल कराळे यांनी युवसैनिकांना मार्गदर्शन केले.युवासैनिकांनी विद्यार्थ्यांच्या, शेतकरी बांधव व नागरिकांच्या समस्या सोडवण्यात तप्तर राहून नागरिकांना न्याय मिळवून देणे, शहरात, व ग्रामीण भागात युवासेनेच्या जास्तीत जास्त शाखा स्थापन करून युवासेना प्रमुख , मा. ना. आदित्य जी ठाकरे साहेब यांचे हात बळकट करून तालुका भगवा मय करणे , शिवसेना पक्षप्रमुख, मा. मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेब यांनी आपल्या मंत्रिमंडळात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहे, ते जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मीडिया, व जनतेमध्ये जाऊन जनतेपर्यंत त्या योजना पोहचविण्याचे कार्य युवासेना पदाधिकारी व युवासैनिक करावे असे प्रतिपादन केले. यावेळी युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा.सचिन थाटे यांनी युवासैनिकांनी शिवसेनेशी एक निष्ठ राहून शिवसेनेची ताकत वाढवण्याची ही वेळ असून जास्तीत जास्त योजना जनते पर्यंत पोहचवून जनतेची कामे करावी असे मत व्यक्त केले . या बैठकी मध्ये अकोट विधानसभा क्षेत्रातील हिवरखेड शहरातील युवासेना पदाधिकारी यांनी विविध समस्या बाबत चर्चा केली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीमुळे नवचैतन्याची वातावरण निमार्ण झाले असून सर्व युवसैनिकांनी स्व.मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनी संकल्प केला आहे
या बैठकीला अकोट मतदार संघाचे युवासेना उपजिल्हाधिकारी तथा विस्तारक राहुल रामाभाऊ,जिल्हा प्रवक्ते प्रा सचिन थाटे , तेल्हारा तालुका अधिकारी विशाल पाथरीकर, शहर अधिकारी राम वाकोडे, तालुका समन्वयक बंटी राऊत , युवासेना शहर प्रमुख हिवरखेड अंकुश निळे , उपतालुका प्रमुख निलेश उमाळे, आकाश इंगळे ,उपशहर प्रमुख , प्रज्वल मोहोड,सुरज देशमुख, स्वप्नील सुरे, गौरव धुळे,वैभव देशमुख, वैभव गावंडे, अंकुश बुरघाटे, आदेश महहले ,,प्रसाद देशमुख,वैभवराज चित्ते, नयन मोहोड,सुरज कांईगे,गोपाल जायले,अमित घोडेस्वार,अभि आसरे, शाम मोहोरे,अंकुश पाटील,तथा युवासैनिक उपस्थित होते.