अकोला : महानगपालिका हद्दीत कोरोना विषाणू कोविड-१९ चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांसोबत अधिकारी व डॉक्टरही बाधित होते आहे. त्यातच आता अकोल्याच्या महापौर अर्चनाताई जयंतराव मसने याही कोरोना बाधिक झाल्या आहेत. कोरोना विषाणूचा विळखा अकोला शहरासह जिल्ह्यात घट्ट होताना दिसत आहे. मधल्या काळात महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणू संसर्गीत रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र आता पुन्हा बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
मनपातर्फे मोठी उमरी परिसरात घेण्यात आलेल्या चाचणीत महापौर अर्चना मसने यांच्यासह त्याचे पती जयंत मसने यांचीही चाचणी करण्यात आली होती. त्यात महापौरांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या नगरसेवक व भापजच्या पदाधिकाऱ्यांंचीही चाचणी करण्यात येणार आहे.