व्हॉट्सअॅप एका नवीन वॉलपेपर फिचरवर काम करत आहे. ज्यामुळे युझर्स वेगवेगळ्या चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर सेट करू शकतील. हे फिचर यापूर्वी iOS बीटा आवृत्तीमध्ये पाहिले गेले आहे. आता लवकरच हे फिचर अँड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध होईल. व्हॉट्सअॅपच्या v2.20.199.5 बीटा व्हर्जनमध्ये या फीचरची चाचणी घेतली जात आहे. हे फिचर सध्या विकसनशील अवस्थेत असल्याने बीटा युझर्सनाही वापरता येणार नाही.
व्हॉट्सअॅप च्या या फीचरची बीटा व्हर्जन लवकरच आणली जाईल. तथापि कंपनीकडून याबाबत कोणतीही तारीख व टाइमलाईन देण्यात आलेली नाही. अंतिम रोल आउट होण्यापूर्वी हे बीटा परीक्षकांसाठी आणले जाईल. हवालानुसार, कंपनी पुन्हा चॅट अटॅचमेंटमध्ये कॅमेरा चिन्ह उपलब्ध करून देत आहे.
कंपनीने अलीकडेच व्हर्जन 2.20.198.9 सह नवीन Google बीटा प्रोग्राम सादर केला आहे. यात लोकेशन आयकॉनची नवीन डिझाईन अॅपच्या अटॅचमेंटमध्येदेखील दिसू शकते. मात्र परत आलेल्या कॅमेर्याच्या आयकॉनबद्दल बोलायचं झाल्यास कंपनीने काही दिवसांपूर्वी रुम्सच्या शॉर्टकटने जागा घेतली होती. रूम्स हे कंपनीचे व्हिडिओ कॉम्प्रेसिंग प्लॅटफॉर्म आहे जे नुकतेच लाँच केले गेले. तथापि, नवीन अहवालात बीटा आवृत्तीमध्ये आयकॉन थेट दिला आहे.
व्हॉट्सअॅप जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. जगभरातील कोट्यवधी लोक याचा वापर करतात. अॅपमधील यूझर्सची आवड कायम ठेवण्यासाठी, कंपनी सतत नवीन अपडेट आणत असते. आता व्हॉट्सअॅपची नवीन मेसेजिंग फीचर्स वापरकर्त्यांसाठी बरीच रंजक होऊ शकतात.