तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोना महामारीमुळे मंडप बिछायत साउंड व्यवसायिकांवर जे बेरोजगारीचे सावट आले आहे त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यभर मंडप बिछायत साउंड व्यवसायिकांद्वारे निवेदन देण्यात येत आहेत त्या अनुषंगाने आज तेल्हारा येथे,
तेल्हारा तालुका मंडप डेकोरेटर्स, बिछायत अँन्ड साउंड, लायटींग असोसिएशन तर्फे
कोरोना महामारीमुळे मंडप, बिछायत व्यावसायिकांवर जी उपासमारीची वेळ आली आहे त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता व मंडप, बिछायत व्यवसायिकांना मागील 4-5 महिन्यापासून परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले आहे आणि अजूनही मंडप, बिछायत व्यवसायाबद्दल काही निश्चितता नसल्यामुळे पुढील दिवस काढणे, परिवाराचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे, हे चित्र फार भिषण आहे तरी शासनाने मंडप, बिछायत व्यवसायिकांना आर्थिक मंडप जाहीर करून, या 4-5 महिन्यात मंडप, बिछायत चे काम पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहोत ते कर्ज आमचे माफ करण्यात यावे, तसेच आमचे लाइट बिल, दुकान भाडे, इत्यादी माफ करण्यात यावे व आम्हाला परिवाराचा उदरनिर्वाह करन्यासाठी आर्थिक मदत जाहीर करावी व लग्न समारंभासाठी केवळ 50 लोकांना परवानगी असल्याने कोणीही ग्राहक आमच्या व्यवसायाकडे फिरकून सुद्धा पाहत नाही, त्यामुळे आम्ही बेरोजगार होऊन आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी आमच्या मंडप, बिछायत, साउंड व्यवसायावर घातलेले निर्बंध शिथिल करावे, जेनेकरून पुढे येणारा नवरात्र उत्सव, लग्न समारंभ, इत्यादी च्या माध्यमातून आमच्या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो व्यवसायिक व हजारो कामगार यांचे काम सुरु होईल,
अन्यथा आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल. अशा आशयाचे निवेदन आज तेल्हारा तहसीलदार श्री सुरळकर साहेब यांना देण्यात आले.
निवेदनावर असोसिएशन अध्यक्ष गणेश लाघे,
उपाध्यक्ष संदीप बोदडे, सचिव संजय नायसे, सहसचिव शे.अहमद शे.अब्बास, कोषाध्यक्ष बाळकृष्ण उर्फ सोनु भड, सहकोषाध्यक्ष शिवाजी दांदळे दानापूर, ज्ञानेश्वर वाघमारे गाडेगाव, सुनील उंबरकार बेलखेड, निशांत भागवत तेल्हारा, रवी रोठे वळगाव रोठे, सुरज नगरे तेल्हारा, गजानन फोकमारे थार, देवदत्त बोदडे जाफ्रापुर, ठाकूर भट्टड तेल्हारा, प्रमोद वडतकार गाडेगाव इत्यादींच्या स्वाक्षऱ्या होत्या.
निवेदनामार्फत असोसिएशन मधील जवळपास 50 व्यवसायिक बंधूंच्या अडचणी व मागणी शासन दरबारी सादर करण्यात आल्या.
यामध्ये दीपक डोंगरे दहिगांव, अनिल मालगे अडगाव बु., प्रवीण बुरघाटे बेलखेड, अक्षय बर्डे तेल्हारा, धीरज वरठे तेल्हारा, गोकुळ ताथोड आडसुळ-उमरी, पंकज कवर तेल्हारा, आरीफ खा खेलदेशपांडे, सत्यपाल खंडेराव भांबेरी, आशिष आठवले तेल्हारा, मंगेश राऊत भांबेरी, शुद्दोधन बोदडे तळेगाव बाजार, प्रदीप गवई पंचगव्हाण, राजेश हागे दानापूर, देविदास मिसाळ दानापूर, गजानन ताथोड तळेगाव डवला, सुरेश मगर तळेगाव बाजार, अविनाश दांडगे तळेगाव बाजार, गजानन गिरी मनब्दा, अयुब शाह तळेगाव बाजार, पवन पाथ्रीकर मनब्दा, गोपाल भालतीलक हिंगणी, सागर उंबरकर पाथर्डी, गणेश जवंजाळ जस्तगाव,कैलास इंगळे तेल्हारा, आशिष नागपुरे बेलखेड, कुलदीप बोदडे तळेगाव बाजार,नाना दामोदर वांगरगाव, शहेनशाह रोशनशाह माळेगाव बाजार, निलेश वसो,अडगाव बु., शरीफ खा खेलदेशपांडे, भूषण सोळंके तेल्हारा, विलास नेमाडे रायखेड, उमेश दांगटे मनब्दा, नित्यपाल सिरसोली, जाधव दापूरा इत्यादींचा समावेश आहे.