अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 596 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 500 अहवाल निगेटीव्ह तर 96 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि. 5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार तर खाजगी लॅब मध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4611 (3710+791+110) झाली आहे. आज दिवसभरात 85 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 30126 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 29316, फेरतपासणीचे 185 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 625 नमुने होते. आजपर्यंत एकूण 30037 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 26327 तर पॉझिटीव्ह अहवाल 4611(3710+791+110) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 96 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 96 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 48 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 22 महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील २२ जण कान्हेरी गवली येथील, तेल्हारा येथील सहा जण, बाळापूर येथील चार जण, सस्ती, आळंदा, गोरेगाव व हातरुन येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित पातूर, चान्नी, सिंदखेड, लहान उमरी, मुर्तिजापूर, राऊत वाडी, जूनेकपडा बाजार व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 17 महिला व 31 पुरुष आहेत. त्यात बेलुरा येथील 18 जण, चोहट्टा बाजार येथील नऊ, कौलखेड, तेल्हारा, सिंधी कॅम्प व केशवनगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित अडगाव ब्रु., पातूर, बाळापूर नाका, गणेश कॉलनी, वाशिम बायपास, बळवंत कॉलनी, शिवसेना वसाहत, जठारपेठ, लहान उमरी, हरिहर पेठ, आलसी प्लॉट, रामनगर व गजानन नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज कोणाचेही अहवाल पॉझिटीव्ह आले नाही. कृपया नोंद घ्यावी.
85 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 56 जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 16 जण, मुर्तिजापूर उप जिल्हा रुग्णालयातून आठ जण, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण तर हॉटेल रणजित येथून तीन जणांना असे एकूण 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
941 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4611 (3710+791+110) आहे. त्यातील 165 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 3505 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 941 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.