अकोट(देवानंद खिरकर)- सावकारग्रस्त शेतकरी समिती,महाराष्ट्र या सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रात लढणाऱ्या समितीच्या प्रदेशाध्यक्ष पदी अकोला जिल्ह्यातील बोर्डी येथील रमेश पाटील खिरकर तर प्रदेश उपाध्यक्ष पदी परभणी येथील येथील बाळासाहेब भाबट खादगावकर यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली आहे. आज दिनांक ६ सप्टेंबर रविवार रोजी समिती च्या बुलडाणा येथिल सर्किट हाऊस येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत समितीचे संस्थापक व सचिव नेताजी अरुण जाधव यांनी खिरकर व भापट यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.महिला आघाडी पदी सौ.सुनीता ताथोड याची निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व नेताजी अरुण जाधव यांनी जमलेल्या सावकारग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून समितीच्या पुढील वाटचालीची दिशा दर्शीवली.या निवडीचे महाराष्ट्रातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे.