मूर्तिजापूर(सुमित सोनोने)-पंचायत समिती सभापती कक्षाचे उद्घाटन दि.०३ सप्टेंबरला दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते पार पडले.
मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये सभापती ऑफिस एका कोपऱ्यात व लहान असल्यामुळे सर्व प.स. सदस्य एकावेळेस आल्यास बसण्यास जागा नव्हती, अशा वेळेस तालुक्यातून आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना सभापती ऑफिस बाहेर ताटकळत उभे राहावे लागत असे. ही बाब सभापती उर्मिलाताई यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला नेहमी खटकत होती. म्हणून त्यांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरच प्रशस्त ऑफिस तयार करून घेतले. याचे उद्घाटन दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी मी जरी या मतदारसंघाचे आमदार नसलो तरी पक्ष या नात्याने आपल्याला संपूर्ण मदत करेल असे आश्वासन दिले. हिरपूर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळेस सभापती उर्मिला डाबेराव, उपसभापती सुभाष राऊत प.स. सदस्य प्रकाश वानरे, देवाशिष भटकर, दादाराव किर्दक ,सविता माहुरे ,जया तायडे, बंडूभाऊ डाखोरे, बाळासाहेब बाजड,निजाम इंजिनियर,नितीन गायकवाड मोहम्मद शहाबुद्दिन,दिनेश दुबे,अमोल तातुरकर,श्रीकृष्ण गुल्हाने,राजूभाऊ जोगदंड,गौतम उमाळे,रोहित सोळंके,किशोर सोनोने,धनंजय काकड, सोहेल शेख,दीपक खंडारे,मिलिंद गावंडे, गणेश जोगळे,तोहसिफ खाॅ,जगदीश जोगळे कक्ष अधिकारी बन्नोरे महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.