पातूर : (सुनिल गाडगे) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे भीडेवाडा येथे इसवी सन १८४८ साली देशातील पहिली शाळा सुरू केली ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवावी या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी जिवाचे हाल-अपेष्टा व अंधश्रद्धेशी लढा घेऊन मुलींना हक्क व न्याय मिळवून देण्याकरिता पुणे भिडे वाडा येथे शाळेची स्मारक उभी केली होती शासनाने त्या शाळेला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याकरिता होत असलेल्या विलंबना करिता माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य पातूर तालुक्याच्या वतीने पातुर तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन दिले आहे अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे यावेळी पातुर तालुक्यातील माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्याचे सदस्य यांनी रोष व्यक्त करून आपल्या भावना प्रकट केल्या संघटनेचे सदस्य बोलताना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी निस्वार्थपणे आपलं जीवन बहुजनांच्या हितासाठी व या देशातील स्त्री शिक्षणासाठी अर्पण केले व आजच्या युगामध्ये स्त्रिया ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या देशांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न सुद्धा पुरस्कार प्रदान झाला नाही याचा माळी युवक संघटनेने खेद व्यक्त केला असून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या लेखणीतून विचारातून या देशाचे संविधानाचे शिल्पकार यांनी आपल्या जीवनातील खऱ्या अर्थाने गुरुवर्य क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना मानले व छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना आजपर्यंत शासनाने भारतरत्न पासून डावलले असून हे खेदाची बाब आहे असे माळी युवक संघटना पातूर च्या सदस्यांनी खेद व्यक्त केले
पातुर तालुक्यातील माळी युवक संघटनेच्या सदस्यांनी निवेदन देऊन आंदोलनाचा दिला इशारा यावेळी. सागर कढोणे, चंदू बारताशे, सुनील पाटील, गणेश गाडगे, गजानन बारताशे, विजय हिरळकार, जिवन ढोणे, नितीन खंडारे उपस्थित होते.